Share

शरद पवारांना दुबईमध्ये दाऊद इब्राहीमने सोन्याचा हार घातला; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar met Dawood Ibrahimin in Dubai - Prakash Ambedkar

Prakash Ambedkar VS Sharad Pawar | 1988-91 मध्ये  शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लंडन दौरा केला होता. पवार लंडनमध्ये दोन दिवस थांबले, तिथून दुबईला गेले. दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  

Sharad Pawar met Dawood Ibrahim as Maharashtra CM in Dubai – Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, 1988-91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा लंडनला होता. तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. त्यांची मीटिंग कोणासोबत झाली, त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे. कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले आणि दोन दिवस लंडनमध्ये थांबले. तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची दाऊद इब्राहीमसोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला असल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  

शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी दुबईमध्ये दाऊदची भेट घेतली

“केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय मुख्यमंत्र्याला विदेशात जाता येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला त्यावेळच्या सरकारची मान्यता होती का? कॅलिफोर्नियात शरद पवार यांनी जी बैठक घेतली त्याची माहिती तत्कालिन केंद्र सरकारला होती का? आणि शरद पवार आणि दाऊद इब्राहिमच्या भेटीची सरकारला माहिती होती का? याची उत्तर केंद्र सरकारने दिली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.

Sharad Pawar met Dawood Ibrahimin in Dubai – Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar VS Sharad Pawar । 1988-91 मध्ये शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लंडन दौरा केला होता. पवार लंडनमध्ये दोन दिवस थांबले तिथून दुबईला गेले. दुबईमध्ये त्यांची dawood ibrahim सोबत विमानतळावर भेट झाली. त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला.

Maharashtra India Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now