🕒 1 min read
मुंबई | IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या या हंगामातील पहिल्या ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराचे श्रेय पत्नी देविशा शेट्टीला दिले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विजयानंतर झालेल्या पोस्ट-प्रेझेंटेशन दरम्यान, पावसामुळे छत्रीखाली उभा असताना, त्याने हे खास क्षण शेअर केले.
“माझ्या पत्नीने आज एक गोड गोष्ट सांगितली – ती म्हणाली, ‘तुला सगळे पुरस्कार मिळाले, पण प्लेअर ऑफ द मॅच नाही!’ त्यामुळे हा पुरस्कार तिच्यासाठी खास आहे. आम्ही नेहमी हे असे क्षण साजरे करतो,” असं सूर्यानं हरषा भोगलेशी बोलताना सांगितलं.
Suryakumar Yadav dedicates first IPL 2025 POTM award to wife Devisha
नमन धीरसह सूर्यकुमारने 57* धावांची नाबाद भागीदारी केली आणि शेवटच्या टप्प्यात संघाला आवश्यक वेग दिला. “एका फलंदाजाने शेवटपर्यंत टिकून राहणं महत्त्वाचं होतं. नमनने दिलेली ऊर्जा निर्णायक ठरली,” असंही तो म्हणाला.
या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाला असून, ते यंदाच्या आयपीएलमध्ये अकराव्यांदा अंतिम चारमध्ये पोहोचले. गोलंदाजीमध्ये मिचेल सॅन्टनर (३/११) आणि जसप्रीत बुमराह (३/१२) यांनी चमकदार कामगिरी केली.
मुंबईचा पुढील सामना पंजाब किंग्जविरुद्ध सोमवार, २६ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होईल. जर इतर सामन्यांचे निकाल अनुकूल ठरले, तर मुंबईला टॉप-२ मध्ये पोहोचण्याची संधी मिळू शकते.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा पिकलबॉलचा खेळ सोशल मीडियावर व्हायरल, RCB चा bonding सेशन रंगात
- ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने तोडले सर्व विक्रम; सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ICC स्पर्धांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर
- शुभमन गिल नाही तर ‘हा’ अभिनेता असता सचिन तेंडुलकरचा जावई, पण कुटुंबियांच्या भेटीनंतर संपलं नातं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now