India
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; जंतरमंतरकडे जाणाऱ्या खासदारांच्या बस पोलिसांनी अडवल्या
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरकडे जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बस पोलिसांनी अडवल्या. यानंतर खासदारांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण: युक्तिवादासाठी नीरज कौल यांची सुप्रीम कोर्टाकडे दोन दिवसांची मागणी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, वकील नीरज कौल यांनी युक्तिवादासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी; पक्षघटनेवरून शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी पार पडली. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी पक्षघटना आणि पक्षांतर्गत निवडणुकांच्या मुद्द्यावरून युक्तिवाद केला.
भारतीय महिला क्रिकेट संघात मोठा बदल; हरमनप्रीत कौरचा राजीनामा, स्मृती मानधना नवी कर्णधार
हरमनप्रीत कौरने राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने स्मृती मानधनाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली असून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठं खिंडार; मोदींचा फोटो हटवत ‘टाटा बाय-बाय’ लिहिलं. बडा नेता पक्ष सोडणार?
राज्यसभेच्या तिकीट वाटपावरून उत्तर प्रदेश भाजपमध्ये असंतोष उफाळला असून, माजी खासदार धर्मेंद्र कश्यप आणि कौशल किशोर यांचे कुटुंब पक्षावर नाराज आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा अचानक रद्द; देशभरात विरोधक आक्रमक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा ७ आणि ८ ऑक्टोबरचा छत्तीसगड दौरा रद्द झाला आहे. मतदार याद्यांच्या कथित घोळावरून विरोधकांनी मोठे आंदोलन पुकारले आहे.
‘मी नाही सांगणार…’ जया बच्चन यांनी पत्रकाराचा माईक ढकलला; कंगना रनौतने व्हिडीओ शेअर करत लगावला सणसणीत टोला
इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान पत्रकाराचा माईक ढकलणाऱ्या जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करत, खासदार कंगना रनौतने त्यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
‘वयाच्या ६० नंतर पुढाऱ्यांनी थांबायला हवं, कारण…’ इंदुरीकर महाराजांचं राजकारण्यांवर थेट भाष्य
वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतर पुढाऱ्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असा थेट सल्ला प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून दिला आहे.
‘अभिनयातला ‘अ’ येत नसला तरी…’; सई ताम्हणकरसाठी अभिनेत्री आरती सोलंकीची पोस्ट
सई ताम्हणकरच्या 'अडकित्ता' सिनेमातील भूमिकेचे कौतुक करताना अभिनेत्री आरती सोलंकीने मराठी प्रेक्षकांना खडेबोल सुनावले आहेत. बॉलिवूडच्या प्रेमावरून तिने संताप व्यक्त केला.
विद्याधर जोशींचा संताप! “राजकारण्यांची स्पॉन्सरशिप आली आणि गणेशोत्सवाची माती झाली”
वाढत्या स्पॉन्सरशिप आणि राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे गणेशोत्सवाची माती झाल्याचं स्पष्ट मत अभिनेते विद्याधर जोशी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे.













