प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेला छत्तीसगडचा दोन दिवसीय दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. गेल्या १५ दिवसांपासून देशभरात विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच ही घडामोड घडली आहे.
छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या पत्रानुसार, ‘काही अपरिहार्य कारणांमुळे’ हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या दौऱ्यात ज्ञानेश कुमार यांना राज्याचे अतिथी म्हणून संबोधण्यात आले होते. त्यांच्या नियोजित दौऱ्यात दंतेवाडा येथील दंतेश्वरी मंदिर, कबीरधाममधील भोरमदेव मंदिर आणि बस्तर जिल्ह्यातील चित्रकूट धबधब्याला भेट देण्याचे नियोजन होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही मुख्य निवडणूक आयुक्तांचा मेरठ आणि वाराणसी येथील दौरा स्थगित करण्यात आला होता.
सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरातील विरोधक आक्रमक झाले आहेत. मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काल राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीतील १९ प्रमुख पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोगाविरोधात मोठे आंदोलन केले.
‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला, तर काँग्रेस नेत्यांनी तब्बल ८ तास धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विरोधकांनी ‘वोट चोर, गद्दी छोड’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. या घडामोडींनंतर आता १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टी (CJP) देखील दिल्लीत मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी; राज्य सरकारला ३ आठवड्यांत आराखडा सादर करण्याचे निर्देश
- ‘काळ्याकुट्ट भुवया घेऊन.. अगं बाई तू ये’ रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रात नवी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण
Quick Answers
छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार, काही अपरिहार्य कारणांमुळे हा दोन दिवसीय दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.
त्यांच्या नियोजित दौऱ्यात दंतेवाडा येथील दंतेश्वरी मंदिर, कबीरधाममधील भोरमदेव मंदिर आणि बस्तर जिल्ह्यातील चित्रकूट धबधब्याला भेट देण्याचे नियोजन होते.
मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेवरून (SIR) देशभरातील विरोधक आक्रमक झाले आहेत.
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला, तर काँग्रेस नेत्यांनी तब्बल ८ तास धरणे आंदोलन केले आणि 'वोट चोर, गद्दी छोड' अशी घोषणाबाजी केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









