Blackheads | नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेवरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. ब्लॅकहेड्स फक्त चेहऱ्याचे सौंदर्य कमी करत नाही, तर ते त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. मात्र, हे उपाय दीर्घकाळ ब्लॅकहेड्सला दूर ठेवू नाही. त्यामुळे नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचे हानी होत नाही. नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकतात.

बेकिंग सोडा (Baking soda-For Blackheads)

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही पेस्ट तुम्हाला नाकावर साधारण दहा मिनिटे लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. बेकिंग सोडा त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यास मदत करतो.

टोमॅटो (Tomato-For Blackheads)

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला ब्लॅकहेड्सवर साधारण पंधरा मिनिटे टोमॅटो लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन वेळा ब्लॅकहेड्सवर टोमॅटो लावल्याने ते सहज दूर होऊ शकतात.

मध (Honey-For Blackheads)

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मधाचा वापर केला जाऊ शकतो. मध त्वचेवर जमा झालेली घाण काढण्यास मदत करतो. मधामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. नाकावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण दहा मिनिटे नाकावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

मध आणि दालचिनी (Honey and cinnamon-For Blackheads)

कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मध आणि दालचिनी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये दालचिनी पावडर मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट साधारण दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हलक्या हाताने कपाळावर स्क्रब करावे लागेल. स्क्रब केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित असे केल्याने कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

अंडी (Egg-For Blackheads)

अंडी फक्त आपल्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अंडी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये आढळणारे घटक कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला अंड्यामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे ब्लॅकहेड्सवर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.