Eknath Khadse | “या लोकांनी विश्वासघात केलाय”; जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर खडसेंची महाविकास आघाडीवर नाराजी

Eknath Khadse | जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बंडखोर नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekhnath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

ऐनवेळी राष्ट्रवादीचे संजय पवार यांची बंडखोरी

मात्र, राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीआयत्यावेळी बंडखोरी करत शिंदे गटाकडून अर्ज दाखल करत विजय मिळवला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि काँग्रेसवर आरोप केला आहे.

“महाविकास आघाडीत अशी अपेक्षा नव्हती”

“महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. राष्ट्रवादीच्या 10 मधील 1 मत फुटले. जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. तरीही सर्वांसाठी पुढाकार घेऊन बँक ताब्यात आणली. पण, शिवसेना आणि काँग्रेसने संजय पवारांना समर्थन केलं. महाविकास आघाडीत अशी अपेक्षा नव्हती. या लोकांनी विश्वासघात केला. त्यामुळे जिल्हा बँकेत आम्हाला धोका मिळाला”, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Eknath Khadse talk about Sanjay Pawar

“संजय पवार हे राष्ट्रवादीचे असल्याचं मानायला तयार नाही. पाच ते सहा दिवसांपूर्वी संजय पवार गुलाबराव पाटलांच्या स्टेजवर होते. संजय पवारांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. संजय पवार विरोधकांशी हातमिळवणी करणार असल्याचा विषय अजित पवार आणि जयंत पाटलांच्या कानावर घातला होता,” असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

“आमच्यातच गद्दारी झाली”- Eknath Khadse 

“काँग्रेस आमच्याबरोबर राहिल हा विश्वास असल्याने संजय पवारांकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, काही मतं फुटली. ज्यांच्यासाठी कष्ट घेतले, ते निवडणुकीत सोबत राहिले नाहीत. सर्वांना एकत्र ठेवण्यात मला यश आलं नाही. आमच्यातच गद्दारी झाली. ही बँक आपल्यापासून दुसऱ्यांच्या ताब्यात जाणं ही बाब गंभीरतेने घेतली पाहिजे. त्यामुळे निश्चित संजय पवारांबाबत पक्षाने निर्णय घ्यावा, असा आग्रह धरणार आहे,” असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-