Gulakand Benefits | उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Gulakand Benefits | टीम महाराष्ट्र देशा: गुलकंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गुलकंदामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडेंट, पोटॅशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. कारण गुलकंदाचा प्रभाव थंड असतो. गुलकंद खाल्ल्याने उष्माघाताची समस्या (Heatstroke problem) दूर होऊ शकते. दररोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Gulakand Benefits)

पोटासाठी गुलकंदाचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. गॅस, अपचन, बद्धकोष्टता, पोट सुजणे, पोट दुखी या समस्यांवर मात करण्यासाठी गुलकंदाचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. गुलकंद खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोट निरोगी राहते.

शरीर थंड राहते (The body remains cool-Gulakand Benefits)

गुलकंदाचा प्रभाव थंड मानला जातो. गुलकंदाचे नियमित सेवन केल्याने शरीर हायड्रेट आणि फ्रेश राहते. उष्णतेमुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी गुलकंद प्रभावी ठरू शकते. दररोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने थकवा, अशक्तपणा, शरीर दुखी यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Gulakand Benefits)

उन्हाळ्यात तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल, तर तुम्ही दररोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केले पाहिजे. गुलकंदाचे सेवन केल्याने वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. गुलकंदाचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स राहते आणि अनेक गंभीर आजारांपासून दूर राहते.

उन्हाळ्यामध्ये दररोज एक चमचा गुलकंद खाल्ल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर उन्हामुळे चिकट केसांची समस्या निर्माण झाली असेल, तर खालील घरगुती उपाय करा.

ग्रीन टी (Green tea For Sticky Hair)

केसांमधील चिकटपणा दूर करण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये ग्रीन टी मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला साधारण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे केस पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने टाळूची पीएच पातळी नियंत्रणात राहते. उन्हाळ्यामध्ये नियमित या मिश्रणाचे वापर केल्याने केसातील चिकटपणा सहज दूर होऊ शकतो.

मुलतानी माती (Multani mati For Sticky Hair)

मुलतानी माती आपल्या त्वचेसोबतच केसांसाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. ही पेस्ट तुम्हाला साधारण वीस मिनिटं केसांना आणि टाळूला लावून ठेवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना मुलतानी माती लावल्याने चिकटपणा दूर होऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.