मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये उद्योगपतींशी संवाद साधताना एक सूचक विधान केले आहे. टीकाकारांना कसे सामोरे जावे आणि आपले काम कसे सुरू ठेवावे, यावर बोलताना त्यांनी ‘कासव’ ही आपली प्रेरणा असल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मुख्यमंत्री असलो तरी मित्रांशी बोलताना आपण मित्रच असल्याची जाणीव त्यांना करून देतो, जेणेकरून त्यांच्यावर दडपण येणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांवरून त्यांच्यावर बरीच टीका झाली आहे. या टीकेकडे कसे पाहता, या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडली. “काही लोक काही काळापुरती हेडलाईन देतात, पण लोक त्यांना नंतर विसरून जातात. मात्र, जे काम झालेले असते, ते पिढ्यान् पिढ्या लक्षात राहते. आपण बरोबर काम करत आहोत असे वाटत असेल, तर अत्यंत धीम्या गतीने का होईना काम करत राहिले पाहिजे,” असे ते म्हणाले.
Devendra Fadnavis speaking about his inspiration
‘कासव हीच माझी प्रेरणा’; देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली कामाची पद्धत
यामागची भूमिका अधिक स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, “कासव चालत राहते, कोणी दगड मारला की ते कवचात जाते. वरून दगड लागत राहतो, पण त्याला काही होत नाही. दगड मारणे थांबले की ते पुन्हा चालत राहते. अर्थात, आपली चाल कासवाची नाही, आपल्या चालीत वेग आहे, पण प्रेरणा मात्र कासवाचीच आहे.” या संदर्भात बोलताना त्यांनी राज्यातील विविध कामांचाही उल्लेख केला. सुरुवातीला विरोध झालेल्या अनेक प्रकल्पांना आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोठ्या पदावर गेल्यावर व्यक्तीला टीका ऐकायला आवडत नाही, असा लोकांचा समज असतो. मात्र, आपण अनेक वर्षांपासून राजकारणात असल्याने समोरच्याला नेमके काय म्हणायचे आहे, हे लगेच समजते, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्र मंत्री आणि निवडणूक आयुक्तांनाच निवडणूक आयोगाची नोटीस; ‘SIR’ मोहिमेत अनेक दिग्गजांची नावे
- दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांची आदित्य ठाकरेंना 500 कोटींची मानहानीची नोटीस
- तुकाराम मुंढे यांचा कामचुकार अधिकाऱ्यांना थेट इशारा; बदलीच्या चर्चेवरही स्पष्ट शब्दांत उत्तर












