दिल्ली (Election Commission): सध्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत पात्रतेची पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान काही मतदारांची नावे वगळली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याच मोहिमेत आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
एसआयआर प्रक्रियेचा भाग म्हणून जारी करण्यात आलेल्या नोटिसांच्या यादीत कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचाही समावेश आहे. निवडणूक आयुक्त एस. एस. संधू यांच्या मतदार नोंदीमधील नावाच्या स्पेलिंगमध्ये तफावत आढळल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावातही विसंगती आढळली आहे.
मतदार यादी पडताळणी: मुख्यमंत्री रेखा गुप्ता अन् केजरीवालांनाही नोटीस
राजधानी दिल्लीत पात्रतेची पडताळणी करण्यासाठी सुमारे 33 लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शनिवारी जाहीर झालेल्या यादीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुमार सचदेवा यांनाही नोटीस देण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, आई-वडील आणि मुलगा यांनी मागील एसआयआर मोहिमेचा आवश्यक तपशील सादर न केल्याचे आयोगाने म्हटले आहे. या कारवाईवरून आम आदमी पक्षाने (आप) भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनुराग ढांडा यांनी या कारवाईला भाजपाचा डाव म्हटले आहे. “भाजपाच्या हातात असते तर त्यांनी केवळ पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यापुरताच मतदानाचा अधिकार मर्यादित ठेवला असता आणि विरोधकांची मते वगळली असती. तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते मतदार यादीतून गायब करण्याची ही कोणती पद्धत आहे?” असा सवाल ढांडा यांनी उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांची आदित्य ठाकरेंना 500 कोटींची मानहानीची नोटीस
- तुकाराम मुंढे यांचा कामचुकार अधिकाऱ्यांना थेट इशारा; बदलीच्या चर्चेवरही स्पष्ट शब्दांत उत्तर
- संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेत मनमानी कारभाराचा आरोप; भूखंड खरेदीच्या नावाखाली ४.२४ कोटींच्या गंगाजळीवर डल्ला?; निबंधकांकडे तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











