Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. त्यांच्या या कारवाईची सध्या राज्यभरात चर्चा सुरू असतानाच, त्यांनी आपल्या भविष्यातील बदली आणि एफडीएतील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
एफडीएमधून बदली झाल्यानंतर पुढे कोणत्या विभागात काम करायला आवडेल, या प्रश्नावर मुंढे यांनी थेट उत्तर दिले. “पुढची बदली कुठे होईल, हे माझ्या हातात नाही. सरकार जो विभाग देईल, तिथे मी काम करेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Tukaram Mundhe on FDA actions and future transfers
तुकाराम मुंढे यांचा एफडीए (FDA) अधिकाऱ्यांना थेट इशारा
कामचुकार किंवा कारवाईत तडजोड करणाऱ्या एफडीए अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, यावर मुंढे यांनी कडक शब्दांत इशारा दिला. “जर कोणी कामचुकारपणा करत असेल किंवा तडजोड करताना दिसला, तर त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवण्याचे कारण नाही. चुकीचे काम करणे किंवा योग्य काम न करणे, या दोन्ही बाबींवर कधीही कारवाई होऊ शकते,” असे ते म्हणाले.
महाराष्ट्राबाहेर किंवा देशपातळीवर काम करण्याबाबत विचारले असता, मुंढे यांनी वर्तमानात काम करण्यावर भर दिला. “मी भविष्याचा खूप विचार करत नाही. सध्या ज्या पदावर आहे, ती जबाबदारी उत्तम प्रकारे कशी पार पाडता येईल, याकडे माझा प्रयत्न असतो,” असे त्यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- संत एकनाथ महाराज शिक्षक पतसंस्थेत मनमानी कारभाराचा आरोप; भूखंड खरेदीच्या नावाखाली ४.२४ कोटींच्या गंगाजळीवर डल्ला?; निबंधकांकडे तक्रार
- मिर्झापूरची बॉक्स ऑफिसवर हवा! रिलीजआधीच जमवला कोट्यवधींचा गल्ला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्ड
- आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची वर्णी!












