मुंबई, 13 सप्टेंबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत उपोषण करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर उपोषणास बसण्यासाठी जरांगे यांनी पोलिसांकडे सर्व अटी-शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र देऊन रीतसर परवानगी मागितली होती. मात्र, सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवत आझाद मैदान पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना आंदोलन करण्यास मनाई केली आहे.
आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्था बाधित होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करून सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आमरण उपोषण आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात येत आहे. आता पोलिसांकडून जरांगे यांना रीतसर नोटीस पाठवून आंदोलन न करण्याबाबत बजावण्यात येणार आहे.
Manoj Jarange Mumbai protest denied by Mumbai Police
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची ‘नो एन्ट्री’
गेल्या वेळी जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केले तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, याचा संदर्भ पोलिसांनी दिला आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर आणि महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचाही या निर्णयात विचार करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये या आंदोलनामुळे मोठी बाधा येऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
काय आहेत पोलिसांच्या पत्रातील मुख्य मुद्दे?
परवानगी नाकारताना पोलिसांनी 2025 च्या नव्या नियमावलीचा संदर्भ दिला आहे. यानुसार, आझाद मैदानात कोणत्याही प्रकारचे ‘आमरण उपोषण’ किंवा आत्मदहन करण्यास कायदेशीर मनाई आहे. जरांगे यांनी 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत 10 वाजता उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती आणि अर्जातही ‘आमरण उपोषण’ करणार असल्याचे नमूद केले होते. हा थेट नियमांचा भंग असल्याचे पोलिसांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाचाही या निर्णयात विचार करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईत होणारी अलोट गर्दी नेहमीच राष्ट्रविघातक शक्तींच्या निशाण्यावर असते, असे पोलिसांनी म्हटले आहे.
तसेच, नव्या नियमांनुसार कोणत्याही आंदोलनाला एका वेळी फक्त एकाच दिवसासाठी परवानगी दिली जाते आणि तीही सकाळी 9 ते सायंकाळी 6 याच वेळेत. संध्याकाळी 6 वाजता मैदान रिकामे करणे बंधनकारक आहे. शिवाय, शनिवार, रविवार किंवा कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी देता येत नाही. त्यामुळे कायदेशीर नियमांच्या आधारे ही परवानगी फेटाळण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अमृता ताईंना शब्द दिलाय, आंदोलन शांततेतच होणार; मनोज जरांगेंचे आश्वासन
- शिंदे-फडणवीसांचा कट, मराठा मोर्चात मला गोळ्या घालण्याचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप
- मराठा आंदोलनाला मदत करणाऱ्यांची चौकशी; बावनकुळे ‘बाईच्या पदराआड’ लपून वार करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











