जालना, 13 सप्टेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘अमृता ताईंना आमचा शब्द आहे, आमचे आंदोलन शांततेतच होईल,’ असे आश्वासन जरांगे यांनी दिले आहे.
सणासुदीचे दिवस पाहता जरांगे शांतता राखतील, असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, “त्या खुन्नसने किंवा टोमणा मारून बोलल्या नाहीत. मायमाउलीच्या शब्दाची भावना आम्हाला कळते. आम्ही भाऊबिजेला त्यांच्याकडे नक्की जाऊ.”
Manoj Jarange on Amruta Fadnavis
मनोज जरांगे यांचा विखे पाटलांवर निशाणा
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मात्र जरांगे यांनी सडकून टीका केली. विखे पाटलांनी शिष्टमंडळाला न भेटता मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. “आता मराठे तुम्हाला मतदान करणार नाहीत. तुमच्याच काळात 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र रद्द होऊ लागले आहेत,” असा थेट हल्ला त्यांनी चढवला.
आपले उपोषण 29 ऑगस्टपासून सुरू असून ते मुंबईपर्यंत चालणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. “मी आता थकलोय, माझं शरीर साथ देत नाही, मी सलाईनवर जगत आहे, पण ही माझी शेवटची लढाई आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवात आंदोलनामुळे अडथळा येणार नाही, हे स्पष्ट करताना जरांगे म्हणाले की, हिंदू धर्माचे सण आमच्याइतके कोणीही पाळत नाही. सरकारने गेल्या वर्षभरात अनेकदा वेळ मागूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नसल्याने आता मागे हटणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलनाला मदत करणाऱ्यांची चौकशी; बावनकुळे ‘बाईच्या पदराआड’ लपून वार करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप
- अभिजीत दिपके यांचा मध्य प्रदेशच्या ‘मुख्यमंत्री’ पदाचा राजीनामा; बालाघाटमधील वादानंतर सरकारला टोला
- सीबीआयची मोठी कारवाई; एक कोटींच्या लाचप्रकरणी CGST अधीक्षकासह सल्लागाराला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











