Share

“तो कुरळ्या केसांचा बाबा…”, राज ठाकरेंनी भरसभेत उडवली अनिरुद्धाचार्यांची खिल्ली

राज ठाकरेंनी अनिरुद्धाचार्यांच्या ‘रावणाचे एक लाख पुत्र’ आणि ‘अस्त्रालय’ दाव्यांची खिल्ली उडवत, देशातील वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधले.

Published On: 

Raj Thackeray mocking Aniruddhacharya during a rally in Mumbai

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सडकून टीका केली आहे. विशेषतः सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तथाकथित प्रवचनकारांवर त्यांनी थेट निशाणा साधला. बेरोजगारीसारख्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठीच तरुणांना कसं भरकटवलं जातंय, हे सांगताना त्यांनी एका बाबाची चांगलीच खिल्ली उडवली.

यावेळी बोलताना त्यांनी कोणाचंही नाव न घेता ‘तो कुरळ्या केसांचा बाबा’ असा उल्लेख करत अनिरुद्धाचार्यांच्या दाव्यांची पोलखोल केली. या बाबाने नुकतीच एक गोष्ट सांगितली होती की, राम-रावणाच्या युद्धात रावणाचे एक लाख पुत्र आणि दीड लाख नातू मारले गेले. यावर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत मिश्किल सवाल केला की, रावणाला तर फक्त दहा तोंडं होती, मग एक लाख मुलं कशी? रावण जेवला वगैरे की नाही? भाबडी जनता अशा भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेवते, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

Raj Thackeray mocks Aniruddhacharya over Ravana story

अस्त्रालय म्हणजे ऑस्ट्रेलिया? राज ठाकरेंचा खरमरीत सवाल

या बाबाच्या (Aniruddhacharya) आणखी एका दाव्याची राज ठाकरेंनी अक्षरशः पिसं काढली. युद्धानंतर उरलेली अस्त्रं रामाने हनुमानाला दहा हजार किलोमीटर दूर ठेवायला सांगितली आणि जिथे ती ठेवली ते ‘अस्त्रालय’ म्हणजे आत्ताचा ऑस्ट्रेलिया देश, असा अजब दावा त्या बाबाने केला होता. यावर राज यांनी थेट विचारलं की, जर असं असेल, तर मग इंग्लंड, हॉलंड किंवा न्यूझीलंडचं काय करायचं? लोक हे सगळं मुकाट्याने कसं ऐकून घेतात.

हे सगळं घडण्यामागे एक विशिष्ट अजेंडा असल्याचं राज ठाकरे म्हणाले. आज देशात बेरोजगारीने उच्चांक गाठलाय, परिस्थिती खरोखर भयानक आहे. पण लोकांना मूळ प्रश्नांवरून दूर ठेवण्यासाठीच जाती-धर्माच्या वादात अडकवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून पद्धतशीरपणे हे नॅरेटिव्ह सेट केलं जात असून, सत्ताधाऱ्यांचे अंधभक्त स्वतःचीच समजूत काढण्यात मग्न आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

याच भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरूनही निशाणा साधला. स्वतः किर्गिस्तानमध्ये जाऊन देशातील जनतेला परदेशात न जाण्याचा आणि सोनं न खरेदी करण्याचा सल्ला देण्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं. जर आपला जीडीपी खरंच चीनपेक्षा चांगला आहे, तर मग आपणच परदेशात का जायचं नाही, असा रोकडा सवाल करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही