‘विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने घाबरला’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर संताप

IIT दिल्लीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून अभिजीत दीपकेंनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारवर संताप व्यक्त केला.

Published On: 

Abhijit Dipke on IIT Delhi student suicide

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) यांनी दिल्लीतील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशाची संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडली असल्याचे म्हटले आहे.

आयआयटी दिल्लीचा विद्यार्थी असलेल्या ३१ वर्षीय ऋषिकेश कुमार याने केलेल्या आत्महत्येबद्दल दीपके यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी अशा वातावरणाची गरज अधोरेखित केली जिथे विद्यार्थ्यांना भीती वाटणार नाही. मात्र प्रत्यक्षात, देशभरातील विद्यार्थी आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहेत आणि ही भीती दूर करणे आवश्यक असल्याचे दीपिकेंनी म्हटले आहे.

Abhijit Dipke on IIT Delhi student suicide

अभिजित दिपके म्हणाले की, “आयआयटी सारख्या संस्थेची गणना ही देशातील सर्वात चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये होते. मागील वर्षभरात आयआयटीमधील ६५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. ही अवस्था आपल्या सर्वात चांगल्या शिक्षण संस्थेची आहे. विद्यार्थ्यांना एकटे सोडले जाऊ नये. त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांना संघर्षाच्या लढाईत एकटं सोडलं जातं.”

२२ ऑगस्ट रोजी ‘लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स’च्या सहाव्या मजल्यावरून पडून ऋषिकेशचा मृत्यू झाला. त्याच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली नाही आणि पोलीस त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. या विद्यार्थ्याच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची चौकशी करण्यासाठी आयआयटी दिल्लीने एका चौकशी समितीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

या समितीत दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि एम्सचे (AIIMS) प्राध्यापक प्रताप शरण यांच्यासह आयआयटी दिल्लीचे कुलसचिव आणि चार विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश आहे.

सुभाष चंद्रांवर साधला निशाणा

अभिजीत दीपके यांनीही सुभाष चंद्रा यांच्यावर टीका केली. केवळ ६ कोटी रुपये भरून २२,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे सामान्य जनतेला काही दिलासा मिळाला का?, असा प्रश्न दीपके यांनी उपस्थित केला.

जर तुमचे ५० लाख रुपयांचे गृहकर्ज असेल, तर केवळ ५० हजार रुपये स्वीकारून बँक ते माफ करेल का? दीपके यांनी या परिस्थितीवर टीका करताना म्हटले की, सामान्य लोकांना व्याजासह कर्जाची परतफेड करावी लागते, तर अशा व्यक्तींना मूळ रक्कमही परत करावी लागत नाही.

“आम्हाला शैक्षणिक कर्जावरही व्याज भरावे लागते. मग २२,००० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठीचा निधी कुठून आला? तो आमच्या खिशातून म्हणजेच आमच्या कराच्या पैशातून आला.” असे दीपकेंनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही