Share

“बावनकुळे साहेब, मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला आलात” : मनोज जरांगे

मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा प्रमाणपत्र प्रकरणात 28 ऑगस्टपूर्वी निर्णय दुरुस्त करण्याचा इशारा देत एकदा माफ केल्याचे सांगितले.

Published On: 

Manoj Jarange warns Chandrashekhar Bawankule

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्याने महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका करत आहे. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी बावनकुळे यांनी काल प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते भावुक झाले. त्यांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगितले आणि आपल्या आईचाही उल्लेख केला. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मी मराठा समाजाच्या विरोधात नाहीत. यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“बावनकुळे साहेब मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, मी माझ्या मराठा समाजावर खूप प्रेम करतो. माझ्या समाजाच्या विरोधात मराठा असला तरी किंवा इतर कोणीही आले तरी मी त्याला सोडत नाही. मात्र, तुम्ही इतके रडकुंडीला आलात कारण मी गुडघे टेकायला लावतो. तुम्ही काल व्यथित झालात याचे आम्हाला देखील वाईट वाटले.” असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange warns Chandrashekhar Bawankule

पुढे मनोज जरांगे म्हणाले की, “भाषणात बोलताना तुम्ही तुमच्या आईचे देखील नाव घेतले. शेवटी आई ही आईच असते. आम्हाला देखील भावना आहेत. आमच्यावरही संस्कार आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा तुम्हाला माफ करतो. इथून पुढे मी तुमच्यावर व्यंग करणार नाही.”

“चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही रडकुंडीला आलात कारण तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात. मला इतके बोलायची गरज देखील नव्हती. तुम्ही परळीकर टोळीच्या नादाला लागलात. या टोळीच्या नादाला लागल्यामुळे तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ आली. त्यांचे ऐकून तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करून मोठा अपराध केला. तुम्ही त्यांचे ऐकायला नको होते.” असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांनी आपल्यावरही संस्कार असल्याचे म्हणत इशारा दिला आहे. “मला सुद्धा आई आहे. मला सुद्धा भावना आहेत. माझ्यावर देखील संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही एकदा, दोनदा माफ करतो. पण इथून पुढे तुम्ही परळीच्या टोळीचे ऐकायचे नाही. सोबतच रद्द केलेले चारही प्रमाणपत्र येत्या 28 ऑगस्टच्या आत दुरुस्त करा.”

“राजकीय दबावापोटी तुम्ही प्रमाणपत्र रद्द केलेत. तुम्हाला जाहीरपणे सांगतो रद्द केलेले चारही प्रमाणपत्र 28 ऑगस्टच्या आत दुरुस्त करा. मात्र आमच्या लेकरांच्या अन्नात विष कालवल्यावर आम्ही कुणाला सोडू शकणार नाही.” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

“आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो. कुणाच्या वाट्याला आम्ही जात नाही. काल तुम्ही रडकुंडीला आलात ते केवळ मराठ्यांच्या नादाला लागल्यामुळे आलात. या वेळेला मी तुम्हाला माफ करून देतो. मात्र इथून पुढे अशी चूक करू नका. माझ्यासह माझ्या मराठा समाजाकडून आम्ही तुम्हाला माफ केल्याचे जरांगे यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही