सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सध्या सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ‘ठाकरे’ आडनावाबाबत काही टिप्पणी केली होती. या विधानांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, पक्ष आणि चिन्हाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असताना गोऱ्हे यांनी ‘ठाकरे’ आडनावावर अनावश्यक भाष्य केले. अंधारे यांनी गोऱ्हे यांच्या बुद्धिमत्तेवर (IQ) प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, त्यांच्या नावातील पहिला अक्षर ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते.
Sushma Andhare criticizes Neelam Gorhe
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, जेव्हा एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असते, विशेषतः सर्वोच्च न्यायालयात तेव्हा प्रत्येकाने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे.
पुढे काय होईल याबद्दल लोक अनेक दावे करत असले, तरी न्यायालयाने एका बाजूचा युक्तिवाद आधीच ऐकला आहे. जो युक्तिवाद यापूर्वी अनेकदा न्यायालयात मांडला गेला होता. प्रसारमाध्यमे या मुद्द्यांना अशा प्रकारे मांडत आहेत की जणू काही ते पहिल्यांदाच उपस्थित केले जात आहेत, याचे मला आश्चर्य वाटते, अशा त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रातील जनतेमध्ये हा पाठ पूर्वीही झाला होता. तरीही जनादेश महायुतीला मिळालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ६० आमदार आणि खासदार निवडून आले आणि त्यानंतर आणखी सहा खासदार त्यांच्या गटात सामील झाले.
कारण नसताना समाजात गढूळ वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचे हे बोलणे सुरू आहे. पुढील सुनावणी, तारीख आणि त्याचा निर्णय जोवर होत नाही, तोपर्यंत त्यांना टाईमपास म्हणून असे दावे करायचे असतील तर करु देत, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
“मला न्यायाधीशांमुळे आत्मविश्वास वाटतो. वकील आपापल्या क्षेत्रात दिग्गज असतात आणि त्यांची नावे अनेकदा जाणीवपूर्वक मोठी करून सांगितली जातात. ते केवळ त्यांचे कर्तव्य बजावत असतात.” मात्र, इतर नावांचे स्थान मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक हे काळ, अनुभव आणि इतिहास ठरवत असतो.”
“त्यामुळे न्यायव्यवस्थेसमोर दबावतंत्र चालणार नाही. न्यायिक प्राधिकरणांसमोर पुरावे सादर केले गेले आहेत आणि निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद मांडले गेले आहेत. नीलम गोऱ्हे यांनी असेही म्हटले की, अंतिम निकाल लागेपर्यंत कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये.”
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
मात्र, ही संपूर्ण परिस्थिती २०२४ पूर्वीची आहे. २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाला. महाविकास आघाडी एकजूट असूनही त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळवता आले नाही, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांनी कडक शब्दांत टीका करताना म्हटले की, फक्त ढगाचा गडगडाट असावा तसं उबाठा मधला ‘ठ’ ऐवजी ‘ढ’ हे अक्षर असायला हवे होते. ज्याचा अर्थ असा की, हा केवळ ढगांचा गडगडाट आहे. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी टिप्पणी केली की, नीलम गोऱ्हे यांच्या नावातील पहिले अक्षर ‘नी’ ऐवजी ‘ची’ असायला हवे होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘गंभीरचं बोलणं कटू सत्य’; कोचवर टीका करणाऱ्यांना हरभजन सिंगचं चोख प्रत्युत्तर
- “समाजाला न्याय मिळत असेल तर टिंगलटवाळी चालेल” : चंद्रशेखर बावनकुळे
- सरकारचा लपंडाव बंद करा; NEET आंदोलनातील FIR रद्द करण्याची ठाकरेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












