Share

‘तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला’; मनोज जरांगे यांचे शिंदेंवर घणाघाती वक्तव्य

मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका करत ‘डबल गेम’ केल्याचा आरोप केला.

Published On: 

Manoj Jarange slams Eknath Shinde over ‘double game’ claim

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. मराठा समाजासाठीच्या (Maratha Samaj) आंदोलनाच्या सुरुवातीपासून जरांगे पाटील यांनी एकदाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली नव्हती.

मात्र, आता पहिल्यांदाच त्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली असून, मुख्यमंत्री ‘डबल गेम’ खेळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भुमरेंसाठी मराठा समाजाच्या पोरांनी जीवाचे रान केले. आमच्या उपकारांची परतफेड करता का? भुमरे मामा तुम्ही सहा नंबरला होते. तुम्ही इतक्या लवकर विसरलात का? सध्या तात्पुरते घ्या आणि नंतर रद्द करा असे बावनकुळे यांनी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत, याचा अर्थ मुकसमंती आहे. संजय सिरसाठ यांनी का केले असावे? हा कट एकनाथ शिंदे यांनीच केला, असाही गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange slams Eknath Shinde over ‘double game’ claim

जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले की, आता उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याची वेळ आली आहे. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला आणि तसे जाहीरही केले होते. केवळ एका जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी ते मराठा तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे यांना कडक इशारा दिला: “शिंदे साहेब, मी तुमच्या सर्व माणसांचा सुपडा साफ करेन, त्यांचा पराभव निश्चित करेन.”

एकनाथ शिंदे यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती, असे सांगत त्यांनी विचारले की, शिंदे किती काळ ‘डबल गेम’ खेळणार आहेत. “मी कोणाचा गुलाम नाही. मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. बावनकुळे हे फडणवीसांचे ‘मालक’ बनले आहेत का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे पाटील यांनी इतकी कठोर टीका करण्याची ही पहिलीच वेळ होती. आपल्या मनात तीव्र रोष असल्याचे सांगत, एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. त्यांनी शिंदे यांना वारंवार इशारा दिला आणि मंत्रालयात बसून कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोपही त्यांच्यावर केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही