🕒 1 min read
नवी दिल्ली: देशातील रस्ते वाहतुकीचे स्वरूप बदलणारे आणि आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुन्हा एकदा एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. उत्तर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी ‘लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे’चे (Lucknow-Kanpur Expressway) उद्घाटन करताना त्यांनी देशात हवेतून प्रवास करणाऱ्या बसेस (Flying Buses) सुरू करण्याची एक मोठी योजना जाहीर केली. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला ६३ किलोमीटर लांबीचा लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, ज्यामुळे या दोन शहरांमधील प्रवास अधिक सुलभ आणि जलद झाला आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान गडकरींनी त्यांच्या पुढील संकल्पनेची माहिती दिली.
‘फ्लाइंग बसेस’ची संकल्पना
एक्सप्रेसवेच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले, “मी नेहमीच देशात नवीन तंत्रज्ञान, रोपवेज आणि केबल कार्स आणल्या आहेत. यापूर्वी मी पाण्यात उतरणारे विमान (सी-प्लेन्स) आणली होती. आता माझा पुढचा प्लॅन हवेत उडणारी बस आणण्याचा आहे”
ते पुढे म्हणाले, “हवेत उडणाऱ्या बससाठी मी ‘इलेक्ट्रिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम’ (Electric Mass Rapid Transport System) विकसित करेन, कारण हे क्षेत्र माझ्या अखत्यारीत येते. या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास कधी झाला, हे समजणारही नाही. मी लवकरच हा प्रकल्प सुरू करेन.”
‘लखनऊ-कानपूर एक्सप्रेसवे’चे उद्घाटन
या महत्त्वपूर्ण एक्सप्रेसवेच्या उद्घाटनामुळे लखनऊ-कानपूर मार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची मोठी सुटका झाली आहे. यापूर्वी या दोन शहरांमधील अंतर कापण्यासाठी अडीच ते तीन तास लागत असत. आता हा प्रवास अवघ्या ३५ ते ४५ मिनिटांत पूर्ण करता येतो. ६३ किलोमीटर लांबीच्या या एक्सप्रेसवेची पायाभरणी २०१८ मध्ये करण्यात आली होती. हा प्रकल्प सुमारे ४,५०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे.
नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) हा संपूर्ण प्रकल्प दोन पॅकेजेसमध्ये विभागला होता. त्यापैकी एक म्हणजे सुमारे १८ किलोमीटरचा ‘एलिव्हेटेड विभाग’ (Elevated Highway), जो लखनऊमधील अमौसी आणि शहीद पथ या भागांना जोडतो. दुसरा विभाग हा सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा ‘ग्रीनफील्ड विभाग’ होता, जो लखनऊमधील ११ आणि उन्नावमधील ३१ गावांमधून जातो. या प्रकल्पाचा ४५ किमीचा ‘ग्रीनफील्ड’ टप्पा ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण झाला. त्यानंतर, २०२६ च्या सुरुवातीला लखनौ पॅकेजचे अंतिम काम ९९% पूर्ण झाल्यावर, जून २०२६ मध्ये यशस्वी ‘चाचणी फेरी’ (Trial Run) घेण्यात आली. आज हा मार्ग अखेर जनतेसाठी खुला करण्यात आला असून, ‘फ्लाइंग बस’बाबत गडकरी यांनी केलेल्या घोषणेमुळे या कार्यक्रमाची मोठी चर्चा झाली.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Weather Update: पावसाची दडी संपणार! राज्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा धो-धो बरसणार
- धक्कादायक! महाराष्ट्रात ‘घोस्ट हॉस्टेल’ घोटाळा; CAG अहवालातून मोठा भ्रष्टाचार उघड
- IRCTC Ticket Booking: कॅप्चाची कटकट कायमची संपणार! रेल्वेच्या नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांचा मनस्ताप टळणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












