Share

श्रद्धा कपूरचा ‘Eetha’ अडचणीत; विठाबाईंच्या कुटुंबीयांनी दिला निर्मात्यांना अल्टिमेटम

श्रद्धा कपूरच्या ‘Eetha’ सिनेमावर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत नाव बदलण्याची मागणी केली असून निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Published On: 

Shraddha Kapoor Eetha Movie Controversy

Shraddha Kapoor Eetha Movie Controversy : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर (Laxman Utekar) यांचा आगामी ‘ईठा’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर श्रद्धा कपूरच्या लूक आणि भूमिकेची मोठी चर्चा झाली. या चित्रपटात ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहे. मात्र टीझर (Eetha Movie Teaser) प्रदर्शित झाल्यानंतर आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी सिनेमाच्या नावावर आणि काही दृश्यांवर आक्षेप घेत निर्मात्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. (Eetha Movie Controversy)

कुटुंबीयांच्या दोन प्रमुख मागण्या

विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, विठाबाईंच्या संघर्षावर सिनेमा तयार होत आहे ही अभिमानाची बाब आहे, मात्र चित्रपट बनवण्यापूर्वी कुटुंबीयांशी चर्चा करायला हवी होती. विठाबाई यांचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी सांगितले की, टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही घटनांबाबत कुटुंबीयांना माहिती देण्यात आली नव्हती. निर्मात्यांनी आधी संपर्क साधला असता तर विठाबाईंच्या आयुष्याबाबत अधिक अचूक माहिती देता आली असती, असे म्हटले.

‘ईठा’ नाव बदलून ‘विठा’ करण्याची मागणी

विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी सिनेमाच्या नावावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, विठाबाईंचे पूर्ण नाव इतिहासात महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘ईठा’ हे नाव बदलून ‘विठा’ करावे आणि त्यासोबत ‘नारायणगावकर’ हे नाव जोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, निर्मात्यांना यासंदर्भात ई-मेलद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. सिनेमाच्या निर्मितीला विरोध नाही. केवळ नाव आणि ऐतिहासिक संदर्भ योग्य असावेत, अशी इच्छा नारायणगावकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

सिनेमातील माहितीवरही कुटुंबीयांचा आक्षेप

कुटुंबीयांनी विठाबाईंच्या जीवनावर आधारित काही लिखाणातील माहितीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, काही घटना चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहे. विठाबाईंच्या आयुष्याचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी कुटुंबीयांशी चर्चा आवश्यक होती. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी निर्मात्यांना 2 ते 3 जुलैपर्यंत संपर्क साधण्याची मागणी केली आहे. जर समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सिनेमा चांगला असेल तर त्याचे स्वागत केले जाईल. मात्र विठाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहोचवणारे काही आढळल्यास त्याविरोधात कायदेशीर लढा दिला जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही