🕒 1 min read
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या बंडखोरीनंतर खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) आणि खासदार संजय राऊत (Sanajy Raut) यांच्यातील वाद आता गगनाला भिडला आहे.
संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. तसेच संबंधित प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता संजय दिना पाटील यांनी राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय पाटील आक्रमक झाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी संताप व्यक्त केला. आपल्यावर आरोप झाले असतील तर चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. “मी खुलेआम बोललो आहे. मी काही चुकीचे केले असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. मी चौकशीसाठी तयार आहे,” असे संजय पाटील म्हणाले.
ठाकरे गट सोडण्यामागचे कारण सांगताना त्यांनी म्हटले की, “माझं शिवसैनिकांसोबत काहीही घेणं देणं नाही, मी हे पहिल्यापासून बोलतोयं. शिवसैनिक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांनी आपल्याला निवडून दिलं. एकदा नाही तर 3 वेळा निवडून दिलं, आमदार बनवलं, 2 वेळा खासदार बनवलं. माझं त्यांच्याशी काही वाकडं नाही, त्यांच्याबद्दल कोणतीही नाराजी नाही.”
मी कशावर रिॲक्शन दिली जेव्हा ते म्हणाले, तुम्ही काही केलं तर आम्ही पाहून घेऊ. मी कशाला काय करू, मला काय पडलंय? जेव्हा ते काही करतील तर आमची तयारी असेल, ते आले तर आम्ही काय मार खायचा? असा सवाल त्यांनी केला. मला काही सेक्युरिटीची गरज नाही. त्यांना सेक्युरिटीची गरज आहे. ते मोठे लोक आहेत, मी पहिल्यापासून त्यांना मानसन्मान खूप दिलाय, असेही ते म्हणाले.
पुढे पत्रकारांची बोलताना म्हणाले की, “यांना लागतात 10-10 लोकं, मला त्याची गरज नाही. मी लोकांच्या मनात आहेत, लोकांच्या मनावर राज्य करतो, लोकांमध्ये जातो, त्यांना भेटतो, त्यांच्या सुखः-दु:खात सामील होतो, तेव्हा लोकं माझ्यासोबत राहतात, माझ्यावर विश्वास करतात. मी कोणालाही जबरदस्तीने पाया पडायला लावत नाही. मी लोकांच्या पाया पडतो, कोणी हात जोडलेले मला आवडत नाही.”
शिंदे गटात (Shinde Gat) जाण्याच्या निर्णयावर बोलताना संजय पाटील म्हणाले की, “मी कोणत्याही फंडासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष सोडला नाही. वारंवार सांगूनही माझा अपमान होत होता, त्यामुळे शेवटी निर्णय घेतला.”
दरम्यान, त्यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले. शिंदेंनी आपल्यावर नाराजी व्यक्त केली नाही. उलट त्यांनी शाबासकी दिल्याचा दावा त्यांनी केला. मी मर्द लोकांसोबत गेलोय, ते मर्दांची कदर करतात. त्यांनी नाराजी नाही तर माझे कौतुक केले,” असे पाटील म्हणाले.
ठाकरे गटात (Thackeray Gat) असतानाही आपण लोकांची कामे करत होतो आणि आता शिंदे गटातही जनतेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वारंवार दुर्लक्ष आणि अपमान होत असल्याने पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा संजय दीना पाटील यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘या’ गटातील आमदार, खासदार बंडखोरीच्या तयारीत? इतर पक्षही अलर्ट मोडवर!
- तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा दावा; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ
- सोने-चांदी खरेदीची घाई करताय? आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे भाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












