Share

मान्सूनची रखडपट्टी संपणार; ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा नवा अंदाज

हर्णे आणि सोलापुरात अडकलेला मान्सून २३ जूनपासून राज्यात पुन्हा वेग घेणार असून, अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Published On: 

Maharashtra Monsoon Update | Rain clouds over Maharashtra as IMD predicts monsoon progress in state.

🕒 1 min read

पुणे (Maharashtra Monsoon) – आठ जूनपासून एकाच जागी अडकलेला मान्सून अखेर पुढे सरकणार का? उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रासाठी आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण कोकणातील हर्णे आणि सोलापूर मुक्कामी थांबलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; २३ जूनपासून दमदार बॅटिंगची शक्यता

सध्या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मान्सूनला गती देणारी नवीन हवामान प्रणाली तयार झाली आहे. त्यामुळेच २३ जूनपासून महाराष्ट्रासह देशातील इतर भागात मान्सून वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या अंदाजानुसार, २५ जून ते २ जुलै या काळामध्ये राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढलेला दिसेल. यातही प्रामुख्याने कोकण पट्ट्यात दमदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दुसरीकडे, आज काही जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह घाटमाथ्यावरील काही भागांना हवामान विभागाने आज ‘यलो अलर्ट’ जारी केला असून तिथे वादळी पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. मात्र, एका बाजूला पाऊस सक्रिय होत असताना विदर्भातील बहुतांश भागात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही