🕒 1 min read
पुणे – एका खासदारासाठी तब्बल ८५ कोटींची बोली लावली जाऊ शकते का? सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हाच सर्वात मोठा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे तब्बल ६ खासदार एकनाथ शिंदे गटात दाखल होणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मंजुरी देखील दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतरच हा मोठा राजकीय भूकंप झाला. काल रात्री चार्टर्ड विमानाने या सर्व खासदारांना दिल्लीत नेण्यात आले.
या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं असा टोला त्यांनी लगावला. हा राजकीय व्यभिचार असून आपण हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.
एका खासदाराचा रेट ८५ कोटी रुपये असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. एवढा पैसा या पक्षाकडे येतो कुठून असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असतानाच ठाकरे गटाकडूनही संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यासमोर आज अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. दुष्काळाचे सावट आहे आणि पाण्याची मोठी टंचाई आहे. शेतमालाला भाव नाही आणि वाढती बेरोजगारी यावर कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळेच सामान्य माणूस अडचणीत असताना लोकप्रतिनिधींचा हा बाजार दुर्दैवी असल्याची खंत पवारांनी व्यक्त केली. देशात असेच चालत राहिले तर जनताच रस्त्यावर उतरून धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठा धक्का, लोकसभा अध्यक्षांनी ६ बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला दिली मंजुरी?
- नोकरी आणि लग्नाचे आमिष, डान्स बारमधून जाळे; भाजपच्या बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा
- संचिता दुसऱ्यासोबतच लिव्ह-इनमध्ये? को-स्टारच्या दाव्याने मनोरंजन विश्वात खळबळ













