Share

‘त्या’ रात्री बाळासाहेबांनी जीव वाचवला नसता तर…; बिग बींनी सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा!

‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांचा जीव कसा वाचवला, याचा थरारक किस्सा बिग बींनी शेअर केला आहे.

Published On: 

Balasaheb Thackerays 100th Birth Anniversary : 'त्यांनी जीव वाचवला'; बिग बींचा मोठा खुलासा!

“मैत्री असावी तर अशी…” असं आपण नेहमी म्हणतो, पण काही किस्से ऐकले की अंगावर काटा येतो. आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती आहे. या खास दिवशी सोशल मीडियावर अनेक आठवणींचा पूर आला आहे. पण यात सर्वात जास्त चर्चा आहे ती बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या एका गौप्यस्फोटाची. अमिताभ यांनी एका मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितलंय की, “आज मी जिवंत आहे ते फक्त बाळासाहेबांमुळेच!”

Amitabh Bachchan & Balasaheb Thackeray 

‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ यांना किती जबर दुखापत झाली होती, हे अख्या देशाला माहिती आहे. तो काळ बिग बींसाठी काळरात्र ठरला असता, जर मदतीला खुद्द बाळासाहेब धावून आले नसते. अमिताभ त्या भयानक रात्रीची आठवण सांगताना आजही भावूक होतात. त्यावेळी मुंबईत हवामान प्रचंड खराब होतं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर काहीच दिसत नव्हतं. अमिताभ यांना तातडीने रुग्णालयात हलवणं गरजेचं होतं, पण साधी रुग्णवाहिका मिळणंही कठीण झालं होतं. तेव्हा “देवदूत” बनून बाळासाहेब ठाकरे मदतीला आले. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता शिवसेनेची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली.

बिग बी म्हणतात, “त्या दिवशी जर बाळासाहेबांनी ती मदत केली नसती, तर आज मी तुमच्यासमोर उभा नसतो.” बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती (Balasaheb Thackerays 100th Birth Anniversary) च्या निमित्ताने हा किस्सा ऐकून आजही चाहत्यांचे डोळे पाणावतात. पण हे नातं फक्त संकटापुरतं मर्यादित नव्हतं. अमिताभ आणि जया यांचं लग्न झाल्यावर बाळासाहेबांचा त्यांना खास फोन आला होता. “तुझं लग्न झालंय, आता सुनेला घेऊन घरी ये,” असा हक्काचा आदेश त्यांनी दिला होता.

जेव्हा हे जोडपं ‘मातोश्री’वर गेलं, तेव्हा बाळासाहेबांच्या आईंनी जया यांचं स्वागत एखाद्या सूनबाईसारखंच केलं. हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत टिकून होते. आज बाळासाहेब आपल्यात नसले, तरी अशा अनेक आठवणींच्या रूपाने ते कायम अमर आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही