Share

बँकेत नोकरीची मोठी संधी; ३५० पदांसाठी भरती सुरु, ‘असा’ करा अर्ज!

Central Bank of India announces recruitment for 350 posts of Marketing and Forex Officers with no negative marking in the exam. Apply now!

Published On: 

Central Bank Bharti 2026: ३५० पदांसाठी भरती सुरु, 'असा' करा अर्ज!

🕒 1 min read

बँकेत अधिकारी होऊन करिअर करण्याचं स्वप्न पाहताय? मग तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India Bharti) ३५० जागांसाठी भरतीची घोषणा केली असून, अर्ज प्रक्रियाही वेगात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत उमेदवारांना परीक्षेबाबत एक मोठा दिलासा मिळाला आहे, जो तुमचं काम सोपं करू शकतो.

Central Bank of India Bharti 2026

सेंट्रल बँकेने मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर या दोन अत्यंत महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात मार्केटिंग ऑफिसरसाठी तब्बल ३०० जागा, तर फॉरेन एक्सचेंज ऑफिसरसाठी ५० जागा राखीव आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे मार्केटिंग किंवा फायनान्सचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही लॉटरीच म्हणायला हवी. २० जानेवारी २०२६ पासून ऑनलाइन अर्जाची खिडकी उघडली आहे.

असं नाही की कोणीही उठून अर्ज करू शकेल. इथे बँकेने ‘क्वालिटी’वर भर दिलाय. फॉरेन एक्सचेंज ऑफिसर (Scale-III) व्हायचं असेल, तर तुमच्याकडे पदवीसोबतच CFA, CA किंवा MBA आणि ५ वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. दुसरीकडे, मार्केटिंग ऑफिसरसाठी MBA किंवा PGDBM आणि २ वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.

बऱ्याचदा बँक परीक्षांमध्ये ‘निगेटिव्ह मार्किंग’मुळे हुशार मुलांचेही मार्क कमी होतात. पण या भरतीत ‘निगेटिव्ह मार्किंग’ नाही! १०० मार्कांचे १०० प्रश्न असतील आणि चुकीच्या उत्तराला गुण कापले जाणार नाहीत. हा उमेदवारांसाठी खूप मोठा प्लस पॉईंट ठरू शकतो. परीक्षा ६० मिनिटांची असेल आणि ती पूर्णपणे ऑनलाइन होईल.

तेव्हा वेळ घालवू नका. सेंट्रल बँकेच्या अधिकृत साईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज भरा, कारण संधी एकदाच येते!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile