10वी पासला सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयात ‘सरकारी’ नोकरी; पगार 56 हजार, संधी सोडू नका!

संरक्षण मंत्रालयात गट क पदांसाठी भरती सुरू झाली असून, फक्त 10वी पास उमेदवारांना 56 हजार रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची संधी आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.

Published On: 

Ministry of Defence Recruitment: 10वी पासला सुवर्णसंधी! पगार 56 हजार

फक्त दहावी पास आहात आणि सरकारी नोकरीचं स्वप्न पाहताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) नोकरीची मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही मोठ्या पदवीची गरज नसून, फक्त 10वी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. पगार ऐकून तर तुम्हीही थक्क व्हाल!

जयपूर येथील ६१ व्या घोडदळ (61st Cavalry) विभागात ‘गट क’ (Group C) पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार १८,००० ते ५६,९०० रुपये इतका जबरदस्त पगार मिळणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे.

Ministry of Defence Recruitment

या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेबद्दल सांगायचं तर, EWS साठी १८ ते २५ वर्षे, OBC साठी १८ ते २८ वर्षे आणि ST प्रवर्गासाठी १८ ते ३० वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

तुम्हाला वाटत असेल की मुलाखत होईल, पण तसं नाही. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना थेट ‘ऑफलाईन’ लेखी परीक्षेसाठी (Written Exam) बोलावलं जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑफलाईन आहे. तुम्हाला A4 साईजच्या कागदावर विहित नमुन्यात अर्ज टाईप करून, आवश्यक कागदपत्रांसह तो जयपूर किंवा दिल्लीच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत हा अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही