🕒 1 min read
पुणे – राजकारणात मैत्री आणि शत्रुत्व कधीच कायमस्वरूपी नसतं, असं म्हणतात. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडतंय, ते पाहून भल्याभल्यांचे अंदाज चुकत आहेत. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा वारंवार होत असतात. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत थेट देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या इशार्याची आठवण करून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला, “अजित पवारांना सोबत घेतल्याचा आता भाजपला किंवा तुम्हाला पश्चाताप होतो का?” यावर उत्तर देताना चव्हाण यांनी कुठलीही राजकीय गोलमाल भाषा न वापरता जे उत्तर दिलं, ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महायुतीत ठिणगी? “मी फडणवीसांना आधीच सांगितलं होतं…”; रवींद्र चव्हाणांच्या ‘त्या’ कबुलीने खळबळ!
चव्हाण म्हणाले, “हो, कार्यकर्ते मला रोज सांगतात… कार्यकर्त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. खरं तर मी देवेंद्र फडणवीस यांना आधीच म्हटलं होतं, की अजित पवारांना सोबत घेताना एकदा विचार करा.”
इतकेच नाही तर, भाजपच्या मूळ मतदारांमध्ये आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या समावेशामुळे मोठी अस्वस्थता असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. एकीकडे महायुतीचे नेते ‘फेविकॉलचा जोड’ असल्याचा दावा करतात, आणि दुसरीकडे खुद्द प्रदेशाध्यक्षच असा घरचा आहेर देत असतील, तर युतीचं भवितव्य काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
चव्हाणांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गट आणि भाजपमधील दरी वाढणार का? आणि मुख्य म्हणजे, फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महायुतीत ‘भूकंप’! रवींद्र चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “दादांना सोबत घेऊन चूक केली, मी फडणवीसांना…”
- छत्रपती संभाजीनगरात भाजपचा ‘गेम’ होणार? गुप्त बैठकीत मराठा समाजाचा एल्गार; जरांगे पाटलांचा थेट इशारा!
- शाहरुख ‘देशद्रोही’ तर बांगलादेशच्या शेख हसीना यांना आश्रय देणारे मोदी कोण? संजय सिंहांचा भाजपला सणसणीत सवाल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












