Share

पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद करून बदला घेतात का? संजय राऊत यांचा मोदींवर निशाणा

Sanjay Raut lashes out at the government over Pahalgam attack response, questions if banning Pakistani YouTube channels is considered revenge.

Published On: 

Sanjay Raut criticized Narendra modi over donald trump announcement of tariffs on india.

मुंबई | जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर बारा दिवस उलटले तरी अद्याप कोणती ठोस कारवाई झाली नाही, असा प्रश्न शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी सरकारला विचारला आहे. “पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केल्याने बदला घेतला गेला असं म्हणता येईल का? हे हास्यास्पद आहे,” असं म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं.

संजय राऊत म्हणाले, “27 जवानांचा बळी गेल्यानंतर जर सरकारचं उत्तर एअरस्पेस बंद करणं, युट्यूब चॅनल बॅन करणं, किंवा हाय कमिशनचा स्टाफ कमी करणं असेल, तर ही थेट देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारी भूमिका आहे.” त्यांनी भाजपवर टीका करत सांगितलं की, “राजकीय विरोधकांवर कारवाई करण्यात जेवढा उत्साह असतो, तो पाकिस्तानविरोधात दिसत नाही.”

Sanjay Raut Criticizes Modi Government: “Is Banning YouTube Channels Revenge for Pahalgam Attack?”

“खरं बदला काय असतो हे शिकायचं असेल, तर इंदिरा गांधींनी कसा बदला घेतला याचा अभ्यास करा,” असंही राऊत म्हणाले. त्यांनी भाजपवर निशाणा साधत सांगितलं की, “हे सरकार केवळ विरोधकांना तुरुंगात टाकतं, पक्ष फोडतं, आणि घरं उद्ध्वस्त करतं.”

राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेवरून देखील राऊतांनी आघात केला. “प्रचारात 2100 रुपये देण्याचं आश्वासन देणारे आता फक्त 500 रुपये देतात. लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही रडत आहात. आधी कसे हसत होतात, मत पाहिजे म्हणून खिशातला पैसा वळवला का सरकारी पैसा आहे, याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींना देखील फसवत आहात.  चोऱ्यामाऱ्या लांड्यालबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकीट मारी केली होती आणि आता ही पाकीट मारी करणं सोपं नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही