Share

“सराईत गुन्हेगार ते पण मोकाटच?”; Anjali Damania यांचा सुदर्शन घुलेवर निशाणा

Social activist Anjali Damania has targeted Sudarshan Ghule over the Santosh Deshmukh murder case.

by MHD

Published On: 

Anjali Damania targeted Sudarshan Ghule over Santosh Deshmukh murder case

Anjali Damania । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सातत्याने त्या नवनवीन खुलासे करत असतात. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

“सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांच्यावर 8 FIR / 49 कलम आहेत. आज मी प्रत्येक सेक्शनचा अर्थ लिहिणार होते. पण किती लिहिणार? आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करुन थकत नाहीत? इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट?,” असा सवाल त्यांनी सरकारला एक्सवर पोस्ट करत विचारला आहे.

नुकताच त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही निशाणा साधला होता. “धनंजय मुंडे बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडनी केली, सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने, जाऊ द्या बोलवत नाही. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतेय,” असा आरोप त्यांनी केला होता.

Anjali Damania on Sudarshan Ghule

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळत नसल्याने राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार? याकडे संपूर्ण राज्यासह देशमुख कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही