Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. महाराष्ट्रात एकीकडे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली असताना दुसरीकडे काही ठिकाणी पावसाचा (Rain) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्याचबरोबर या हवामानाचा शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. अशात हवामान खात्याकडून विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rain forecast at ‘this’ place in the state
नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानात बदल (Weather Update) जाणवत आहे. तापमानात मोठी वाढ झाल्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागपूरमध्ये काल (24 मे) कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान 25.5 अंश सेल्सियस होते.
दरम्यान, 25 मे ते 27 मे या कालावधीमध्ये या ठिकाणी तापमान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) दिली आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उकडा आणि आर्द्रतेचं प्रमाण जास्त असलं तरीही या भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुढील 48 तासात बंगालच्या उपसागराचा दक्षिण पट्टा, अंदमान आणि निकोबार बेट समूहाच्या काही भागांमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून वारे पुढे सरकण्याची पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीला वेग मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख
- LSG vs MI | मोठी बातमी- मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत; खेळतांना होणार त्रास
- LSG vs MI Qualifier 2 | प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबईच्या चिंतेत वाढ! आलं ‘हे’ कारण समोर
- sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा
- Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…