Skin Care | चेहरा चमकदार बनवण्यासाठी काकडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Skin Care : काकडी ( Cucumber ) मध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर मानले जाते. आरोग्यासोबतच काकडी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बहुतांश लोक काकडीचा क्लिनर म्हणून वापर करतात. त्या व्यतिरिक्त काही लोक काकडीचा फेस पॅक चेहऱ्याला लावतात. कारण काकडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील अनेक समस्यांवर मात करतात. त्वचेवरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काकडीचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

काकडीची कोशिंबीर (Cucumber Salad for Skin Care)

त्वचेला आतून पोषण देण्यासाठी तुम्ही काकडीचे कोशिंबीर स्वरूपात सेवन करू शकतात. रोज काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर याच्या नियमित सेवनाने त्वचा चमकदार आणि मऊ दिसू लागते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे काकडीच्या कोशिंबिरीचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते.

काकडीचा रस (Cucumber Juice for Skin Care)

तुम्हाला जर चमकदार आणि गोरी त्वचा हवी असेल, तर तुम्ही नियमित काकडीच्या रसाचे सेवन करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी काकडीचा रस प्यायल्याने शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. परिणामी त्वचेवरील चमक वाढू शकते. त्याचबरोबर त्वचा हायड्रेट राहू शकते.

काकडीचा फेस पॅक (Cucumber Face pack for Skin Care)

चेहऱ्यावरील डाग, पुरळ किंवा लाल पुरळ दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा फेस पॅक वापरू शकतात. यासाठी तुम्हाला काकडी किसून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला काकडीचा कीस पूर्ण चेहऱ्यावर लावावा लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा लागेल. नियमित याचा वापर केल्याने त्वचेवरील डाग आणि पुरळ कमी होऊ शकते.

Cucumber Salad for Skin Care | Cucumber Juice for Skin Care | Cucumber Face pack for Skin Care

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या