Sharad Pawar | “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत…”; PM पदाबाबत शरद पवारांचा मोठं वक्तव्य

Sharad Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी घेतलं जातं. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, असं विधान शरद पवारांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पुण्यामध्ये बालगंधर्व मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान पदाबाबत वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये मी अजिबात नाही. आम्हाला देशाच्या विकासाला चालना देणारे आणि स्थिर नेतृत्व हवे आहे. जनता ज्यांना साथ देईल त्यातूनच एक उत्तम नेतृत्व उभे राहील. या नेत्यांना मदत आणि साथ देणे ही माझ्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे.

Sharad Pawar’s big statement about the post of PM

“मी पुढची निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे पंतप्रधान पदाचा संबंधच येत नाही.” शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण विरोधकांचा पराभव करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची गरज असल्याचे अनेक नेतेमंडळी म्हणतात.

यावेळी बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी जयंत पाटलांचे ईडी चौकशीबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “जयंत पाटील यांच्या चौकशी बद्दल पूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. मात्र, महाराष्ट्रामध्ये चांगले काम करणारे प्रशासक असं जयंत पाटलांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावलं यात काहीच कमीपणा नाही. कारण ईडी सारख्या तपास यंत्रणेचा गैरवापर कसा केला जातो याचं हे एक उदाहरण आहे.”

महत्वाच्या बातम्या