Share

“लाल किल्ल्यावरुन खोटं बोलणारा पंतप्रधान”; खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवतात – संजय राऊत

sanjay raut critisim on pm narendra modi election commission after not announce election dates in Maharashtra । Election Commission of India announced assembly elections | “महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळेच तुम्ही निवडणूक घेत नाही”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

Published On: 

sanjay raut narendra modi election commission

🕒 1 min read

मुंबई । निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ( Election Commission of India announced assembly elections ) परंतु, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. यावर Sanjay Raut यांनी टीका केली आहे.

“नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर भाषण करताना छाती पुढे करुन ‘वन नेशन, वन इलेक्शन’ असे सांगितले होते. पण ते चार राज्यातील निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या फक्त चार राज्यातील निवडणुका जर सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते सरकार वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणा करत आहे. खोटारडे कुठले, लोकांना मूर्ख बनवत आहेत.

महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे. झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे. म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे. त्यामुळे तुम्ही या दोन राज्यातील निवडणुका घ्यायला तयार नाहीत. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा आणखी एक हप्ता महिलांना लाच म्हणून द्यायचा आहे. त्यामुळेच तुम्ही निवडणूक घेत नाही”, असा आरोप संजय राऊतांनी केला.

“लाल किल्ल्यावरुन खोटं बोलणारा पंतप्रधान ( Narendra Modi ) ” – Sanjay Raut

“वेळेत निवडणुका घ्या. जर तुम्ही वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा करता तर मग सुरुवात करा. या चार राज्यांच्या निवडणुका घ्या, देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलची मागणी करावी. मोदी लाल किल्ल्यावरुन खोट बोलतात. लाल किल्ल्यावरुन खोटं बोलणारा प्रधानमंत्री.

वन नेशन वन इलेक्शन म्हणणारे महाराष्ट्रात निवडणूक घेऊ शकत नाही. झारखंडची निवडणूक घेऊ शकत नाही. चार राज्यांची निवडणूक तुम्ही एकत्र घेऊ शकत नाही आणि वन नेशन वन इलेक्शन म्हणतात”, अशी टीकाही Sanjay Raut यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

The Election Commission of India announced assembly elections

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही