🕒 1 min read
नवी दिल्ली | ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाचा संदर्भ देत सरकारला थेट सवाल केला की, भारताने किती विमाने गमावली? आणि हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती का देण्यात आली?
राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करत एक्स (Twitter) वरून सरकारला प्रश्न विचारले. त्यांनी म्हटले, “आपल्या हल्ल्याच्या आधी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीच याची कबुली दिली आहे. हे कोणी अधिकृत केलं? यामुळे आपल्या वायुदलाचे किती नुकसान झाले?”
Rahul Gandhi Questions Govt on Operation Sindoor
त्या व्हिडिओमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणतात, “ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला कळवलं की आम्ही फक्त दहशतवादी तळांवर हल्ला करत आहोत, लष्करावर नाही.” यावरून राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, 7 मे रोजी लष्कराने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची माहिती दिली होती. यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, भींबर, सियालकोट आणि बहावलपूर येथील लाँचपॅड, प्रशिक्षण केंद्रे, आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या गटांचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- RCB vs KKR सामना रद्द होण्याची शक्यता, केकेआरचं आव्हान धोक्यात
- सुप्रीम कोर्टातच अभिनेत्री निम्रतच्या पार्श्वभागाला स्पर्श; कोर्टरूममध्ये १९व्या वर्षी अनुभव
- शिंदे गटाच्या आमदाराकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण? जीवे मारण्याची धमकी













