🕒 1 min read
पैठण ( छत्रपती संभाजीनगर ) । उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पैठण येथे शिवसंवाद मेळाव्यासाठी आले होते. पैठण येथील संत एकनाथ साखर कारखान्याच्या आवारात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरेंचा खरपूस समाचार घेतला.
पैठणमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, पैठण ही संताची भुमी आहे. एकनाथांच्या नावाला कलंक लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आला आहे. त्याचा दुसरा चेला चपाटा ज्या आपण सतत पाच वेळा निवडून दिला. पण निष्ठेचं पाणी त्याला कळालं नाही. म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला. आता गद्दारीला गाडण्याची वेळ आली आहे. कारण ही गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही, गद्दारी फक्त उद्धव ठाकरेंशी नाही तर पैठण आणि पैठणकरांशी आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केलेली आहे.
गद्दार ( Sandipan Bhumre ) इथे उभा राहिला असता तर त्याला इथल्या इथे आडवा केला असता. पण पलीकडे जाऊन उभा राहिला, कुणी मदत केली. हे दुर्दैव आहे. शिवरायाच्या महाराष्ट्राला त्यांनी कलंक लावला आहे. आणि तो कुणी लावला दिल्लीत बसलेले त्यांचे बाप. कारण मिंध्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितले की, मोदी आणि शहांना धन्यवाद देतो की त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली.
तसेच पंतप्रधान सरन्यायाधीशाच्या घरी गेले, गणपतीच्या पाया पडले, आरती केली. ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती, पण तारीख पे तारीख सुरू आहे. आता 21 ऑक्टोबरला तारीख दिली आहे. मी सरन्यायाधीशांना विनंती करतो की माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण अशी तारीख देण्यापूर्वी तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख द्या म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही मोकळे.
एका बाबतीत सरन्याधीशांनी मी धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येत आहेत म्हणून त्यांनी गणपती बाप्पााला पुढची तारीख दिलेली नाही. न्यायदेवतेवर विश्वास आहेच पण लोकमान्य टिळक ब्रिटिश कोर्टात म्हणाले होते की तुमच्यापेक्षाही मोठे न्यायालय आहे जनतेचे न्यायालय. पैठण तालुक्यात गद्दारी झाली आहे. तुमच्याकडे मी न्याय मागायला आलोय तारीख मागायला आलेलो नाही. सर्वोच्च न्यायालय बद्दल आम्हाला आदर आहेच, पण त्या न्यायाला विलंब लागत असेल तर ते न्याय नाकारण्यासारखे आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दार भामट्याला ( संदीपान भुमरे) सहज पकडून ठेवले असते
साधा स्लीपबॉय होता संधी दिली तर आमदार झाला. पाच वेळा आमदार झाला तर माला वाटला की निष्ठावान आहे आता तरी मंत्री करावा त्यामुळे मी मंत्री केला. पण माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या मिंध्यांनी आणि गद्दारांनी शिवसेना या आईच्या कुशीवर वार केला.
ज्या दिवशी गद्दारी झाली तेव्हा मी त्यांना पकडून ठेवू शकलो असतो. मी मुख्यमंत्री होतो, या भामट्याला सहज पकडून ठेवलं असतं. पण जो मनाने सडला आहे, मनाने विकला आहे असा एकही साथीदार मला नकोय. मी त्यांना दारं मोकळी केली आणि म्हटलं गेट आऊट, सूरत गुवाहाटीला जिथे जायचं आहे तिथं जा. आता माझ्याकडे काही नसताना तुम्ही माझ्यासोबत आहात. हीच तर माझ्या आयुष्याची कमाई, शिवसेना प्रमुखांचे माँसाहेबांचे आशीर्वाद आहेत.
सत्ता असली काय नसली काय मला पर्वा नाही. शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव एक लक्षात ठेव सत्ता येते जाते परत येते. पण एकदा का शब्द दिला तर जीव गेला तरी बेहत्तर शब्द खाली पडू देता कामा नये. हा ठाकरे ब्रॅण्ड असाच झालेला नाही. आमच्याकडे सत्ता नसली तरी शब्दाला जागे राहण्याची आमची घराणेशाही आहे, हे मला मोदींना मुद्दामहून सांगायचे आहे.
घराघरात मशाल गेल्यानंतर गद्दारांना घाम फुटला असणार. घरात मशाल गेल्यानंतर संदीपान भुमरे यांच्या बुडाला आग लागणारच आणि ती लावायलाच मी आलेलो आहे. असे गद्दार पैठणच्या राजकारणात वळवळ करता कामा नये. पैठणच्या या गद्दाराला ( Sandipan Bhumre ) मी गाडायला आलोय.
Uddhav Thackeray VS Sandipan Bhumre Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा; बेताल संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा
- संजय राऊत, चंद्रकांत खैरेंच्या कुशल खेळीने अंबादास दानवेंची पैठण विधानसभेत कोंडी
- अजित पवार गटाच्या युवा नेत्याने मागितली २५ लाख रुपयांची खंडणी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












