Nitesh Rane | “उद्धव ठाकरेंनी मुंबईत दंगली भडकवण्यासाठी बैठक घेतली होती” ; नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Nitesh Rane | मुंबई: नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 2004 साली उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुंबईत दंगली घडवून आणण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीत दक्षिण मुंबई आणि चर्नी रोड येथील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ले करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते, असा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. राणेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातील दंगलींवर प्रतिक्रिया देत आमचं महायुतीचे सरकार दंगली घडवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र, 13 ऑगस्ट 2004 रोजी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलून दंगली घडवून आणल्या होत्या. या बैठकीला एका खासदारासह तीन जण उपस्थित होते. यामध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश होता. 1992-93 मध्ये ज्या पद्धतीने दंगली झाल्या होत्या, तशाचं दंगली घडवून आणण्याची चर्चा या बैठकीमध्ये झाली होती, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट गेल्या नऊ महिन्यापासून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. गृह खात्याने त्यांची चौकशी केली पाहिजे”, अशी मागणी देखील राणेंनी केली आहे.

संजय राऊतांवर राणेंचा घणाघात (Rane’s attack on Sanjay Raut)

“संजय राऊत किती मोठा लँड माफिया आहे हे मी सर्वांना सांगत आहे. अलिबागला संजय राऊत यांना जागा हवी होती. त्यांनी ही जागा मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावात दमदाटी करून घेतली. मुंबईतले विक्रोळी, भांडुप या भागांमध्ये आर नावाच्या बिल्डरसोबत राऊतांची पार्टनरशिप आहे. त्यांच्यामार्फत ते जमिनी बळकवायचे काम करतात. दुसऱ्यांना माफिया म्हणणारा राऊत स्वतः एक मोठा लँड माफिया आहे”, असं म्हणतं नितेश राणेंनी (Nitesh Rane) संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

महत्वाच्या बातम्या