🕒 1 min read
Maharashtra Bandh | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाईघाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप आता विरोधक करत आहेत.
शिवप्रेमींनी २८ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्याबाबत एक पत्रक काढून ‘महाराष्ट्र बंद’ला ( Maharashtra Bandh ) उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.
पत्रकात काय म्हंटले?
आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना सरकारच्या नाकर्तेपणा मुळे झाली आहे. आपण छत्रपतींचे त्यांच्या विचारांचे पाईक आहे. आज जर आपण बोललो नाही तर पुन्हा तेच होणार. याचा जाहीर निषेध 28 तारखेला शिवप्रेमी जनतेच्या वतीने उत्स्फूर्त होऊन #महाराष्ट्र_बंद करू या..!!!
आपल्या महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवून शेतकऱ्याच्या शेताच्या देठाला सुध्दा हात लागणार नाही याची काळजी आपण घेऊ. राज्यातील अत्यावशंक सेवा सोडल्यास लोकांना सर्वांनी महाराजांच्या सन्मानाखातर ह्या बंदला ( Maharashtra Bandh ) आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ.

Maharashtra Bandh 28 august 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा शिंदे आणि भाजपने फक्त स्वार्थी राजकारणासाठी वापर केला आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा – विनायक राऊत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पोलीस फौजदारी कारवाई करावी आणि ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली.
सुप्रिया सुळे यांची X पोस्ट
देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आज कोसळला, तो पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”मी आदित्य ठाकरेंची माफी मागतो, पण … आदित्य ठाकरेंनी” – नितेश राणे
- चित्रा वाघ म्हणतात, असे १७६० तंगड्याला घेऊन फिरते तर मेहबूब शेख म्हणतात, ‘ती’ नीच, थर्ड क्लास, सुपारीबाज
- उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्याचा शरद पवारांकडून आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












