Share

”मी आदित्य ठाकरेंची माफी मागतो, पण … आदित्य ठाकरेंनी” – नितेश राणे

Nitesh Rane Vs Aaditya Thackeray । Sanjay Raut । ”मी आदित्य ठाकरेंची माफी मागतो, पण … आदित्य ठाकरेंनी”. संजय राऊत उघडपणे महिला डॉक्टरला शिव्या देतात. त्याबद्दल काही बोललं जात नाही.

Published On: 

Nitesh Rane Vs Aaditya Thackeray । Sanjay Raut

Nitesh Rane Vs Aaditya Thackeray ।  दिशा सालियान यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे अनेक वेळा राणे परिवाराने सांगितले आहे. आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरला आले असता, पत्रकारांनी ठाकरे यांना सालियान प्रकरणांवर प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, हे राजकीय सगळे चालू राहील. ज्यांना ते घाबरतात त्यांची बदनामी असेल, धमकवण्याचा प्रयत्न असेल, असे अनेक राज्यांमध्ये, अनेक दिवसांपासून आम्ही पाहतो, असे ठाकरे म्हणाले.

यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ”दिशा सालियान हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे यांनी दिला तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे. आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन आणि सुशांतसिह यांच्याबद्दलच का विचारतात? असे नितेश राणे म्हणाले.

Nitesh Rane Vs Aaditya Thackeray । Sanjay Raut

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दोघेही महिला अत्याचार आणि विकृतीवर बोलतात, पण त्यांचे चारित्र्य पाहिलं तर त्यांनी फक्त यात डॉक्टरकी मिळवायचीच बाकी आहे. ”ते दुसरे भांडूपचे देवानंद.. ( संजय राऊत ) ते उघडपणे महिला डॉक्टरला शिव्या देतात. त्याबद्दल काही बोललं जात नाही. त्या महिलेला त्रास दिला जातोय. संजय राऊत यांनी त्या महिलेबाबतसुद्धा बोलावं.

आदित्य ठाकरे यांना आज छत्रपती संभाजीनगर मध्ये हॉटेलमध्ये लपण्याची वेळ आली आणि दोन डायपर बदलायची वेळ आली असल्याचे व्यक्तव्य त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही