Badlapur Rape Case | बदलापूर आणि राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने २ ४ तारखेला महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. या ‘महाराष्ट्र बंद’ च्या विरोधात गुणरत्न सदावर्तें (Gunaratna Sadavarte) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंची मागणी मान्य करत महाराष्ट्र बंदला परवानगी नाकारली आहे. “कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी”, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन शरद पवारांकडून करण्यात आले आहे. X पोस्ट वर शरद पवार लिहितात, ”बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.’‘
Sharad Pawar Withdrawal Maharashtra Bandh
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, महाविकास आघाडीला झटका; गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य
- रुपाली चाकणकर, चित्रा वाघ बदलापूर घटनेवर राजकारण करतात; करुणा मुंडेंचे वाघ-चाकणकरांवर गंभीर आरोप
- बदलापूर प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसांनी धमकावले; FIR दाखल करण्याची दिली धमकी













