🕒 1 min read
Chitra Wagh vs Mehboob Shaikh | मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चित्रा वाघ या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायको असल्याची टीका शेख यांनी केली होती. चित्रा वाघ या नीच, थर्ड क्लास, ब्लॅकमेलर आणि महिला नावाला कलंक असल्याचे शेख यांनी व्यक्तव्य केले होते .
रेणू आणि करूणा शर्माने धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दिली होती, त्यांच्या गाडीत पिस्तूल ठेवले होते, तेव्हा Chitra Wagh यांच्या थोंडात काय गेले होते, कोणत्या दाभणाने तोंड शिवले होते. तसेच चित्रा वाघ यांना बाप बदल्याची सवय आहे, आता नवीन बाप गृहमंत्री आहे, त्याला जाऊन सांग, मी जर काही केलं असेल तर मेहबूब शेखची नार्को टेस्ट करायला पण त्या अगोदर तू किती महिलांना लपवले, किती पैसे घेतले याची नार्को टेस्ट कर, असे आव्हान शेख यांनी वाघ यांना दिले होते.
भारतात चित्रा वाघ सारखी मोठी ब्लॅकमेलर बाई नसेल. मुली-महिलांवर अत्याचार होतो, त्याच्यात दलाली करून वाघ पैसे खातात. वाघ मुलींना कोंडून ठेवते. चित्रा वाघ महिला नावाला कलंक असल्याची टीका मेहबूब शेख ( Mehboob Shaikh ) यांनी केली.
लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोची माफी मागत असतो का? ‘हड’ म्हणत शेख यांचा चित्रा वाघांवर निशाणा
यावर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांची माफी मागावी, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे प्रसाद लाड म्हणाले होते. त्यावर शेख म्हणाले की, ”लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोची माफी मागत असतो का? ‘हड’ म्हणत असले लई ‘प्रसाद लाड’ बघितले असल्याचे मेहबूब शेख म्हणाले.
कोणी लाडाचा प्रसाद मागितला? तेव्हा लाज नाही वाटली का? असले लई ‘प्रसाद लाड’ बघितले
मेहबूब शेख यांच्या आरोपांवर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की,” त्यांच्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने क्लिन चीट दिली आहे. असे सतराशे साठ मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते, मेहबूब शेख बलात्कारी असल्याचा पुनर्रउच्चारही वाघ यांनी केला आहे.
असे सतराशे साठ मेहबूब शेख मी तंगड्याला घेऊन फिरते; Mehboob Shaikh बलात्कारी आहे – Chitra Wagh
महत्वाच्या बातम्या
- उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्याचा शरद पवारांकडून आवाहन
- महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, महाविकास आघाडीला झटका; गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य
- रुपाली चाकणकर, चित्रा वाघ बदलापूर घटनेवर राजकारण करतात; करुणा मुंडेंचे वाघ-चाकणकरांवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












