Share

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’साठी थेट मोदींना साकडं! आखाती देशांत असं काय घडलं? निर्माते हवालदिल

IMPPA urges PM Narendra Modi to intervene as Ranveer Singh’s ‘Dhurandhar’ faces a ban in Middle Eastern countries causing financial loss.

Published On: 

IMPPA urges PM Narendra Modi to intervene as Ranveer Singh's 'Dhurandhar' faces a ban in Middle Eastern countries causing financial loss.

🕒 1 min read

सिनेमा तोच, कलाकारही तेच, पण सीमा ओलांडली की नियम बदलतात आणि त्याचा फटका कोट्यवधींच्या व्यवसायाला बसतो. बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करणाऱ्या रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar Movie) या सिनेमासमोर आता परदेशात मोठं संकट उभं राहिलं आहे. प्रकरण इतकं तापलंय की, आता यात थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच लक्ष घालावं, अशी विनंती निर्मात्यांनी केली आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपत्राला भारतात प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. पण दुसरीकडे, आखाती देशांनी (Middle East Countries) या सिनेमाचे दरवाजे बंद केले आहेत. युएई, बहरीन, कुवेत, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वितरकांचे आणि निर्मात्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

A direct appeal to Modi for ‘Dhurandhar’!

या बंदीमुळे हवालदिल झालेल्या ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (IMPPA) थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पत्रात IMPPA चे अध्यक्ष अभय सिन्हा यांनी म्हटलंय की, “ही बंदी एकतर्फी आणि अनावश्यक आहे. सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र असूनही अशी बंदी घालणे म्हणजे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे.”

‘मैत्रीपूर्ण संबंधांचा’ हवाला IMPPA ने पत्रात भारताच्या राजनैतिक संबंधांचाही उल्लेख केला आहे. “आखाती देश हे भारताचे मित्रराष्ट्र आहेत. आपण त्यांच्यासोबत नियमित व्यवसाय करतो. त्यामुळे भारत सरकारने आपल्या स्तरावर हा विषय संबंधित देशांच्या अधिकाऱ्यांकडे मांडावा आणि ही बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करावेत,” अशी कळकळीची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

रणवीर सिंगसारखा बडा स्टार आणि आदित्य धरसारखा दिग्दर्शक असूनही ‘धुरंधर’ला परदेशात लागलेले हे ग्रहण मोदींच्या मध्यस्थीने सुटणार का? याकडे आता संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!