Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जे केलं होतं तेच अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. हा धक्का पचवला जात असताना आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस आमदारांचा नंबर असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी शरद पवारांचं (Sharad Pawar) वय काढलं आहे. त्यामुळे तीस ते चाळीस टक्के लोक मागे फिरण्याच्या तयारीत दिसत आहे. आमदारांची देखील अशीच काही परिस्थिती दिसत आहेत. येत्या दहा ते पंधरा दिवसात बघाच काय-काय होतं. त्याचबरोबर पुढच्या निवडणुकीत यामध्ये काँग्रेस आमदारांचा देखील नंबर लागू शकतो. मात्र, जेव्हा निवडणूक येतील तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल.”
The people of the state have lost faith in the BJP – Rohit Pawar
पुढे बोलताना ते (Rohit Pawar) म्हणाले, “राज्यातील जनतेचा भारतीय जनता पक्षावरून विश्वास उडालेला आहे. त्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण लोकांच्या प्रेमाखातर केलेले नाही. त्याचबरोबर त्यांनी हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी देखील केलेलं नाही. त्यांनी हे फक्त आणि फक्त सत्तेसाठी केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भाजपकडं नकारात्मक दृष्टीने बघत आहे. आपल्या हातात सत्ता ठेवण्याच्या उद्देशानं भाजपनं हे सर्व केलं आहे.”
“भारतीय जनता पक्षाच्या गलिच्छ विचारसरणीशी लढायला आम्ही तयार आहोत. येत्या काळात आम्ही भाजपला धडा शिकवणार आहोत. त्यासाठी आम्ही पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवारांनी शरद पवारांचं वय काढल्यामुळे बैठकीला असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी उपस्थित असणारे अनेक पदाधिकारी मागे फिरण्याच्या भूमिकेत आहे”, असही (Rohit Pawar) ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंवर आजच्या राजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम झालायं – देवेंद्र फडणवीस
- Chitra Wagh | तुमच्यासारख्या भामट्यांमुळे राजकारणाचा दर्जा खालवलायं; चित्रा वाघांनी संजय राऊतांना धारेवर धरलं
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांना ‘कलंक’ हा शब्द एवढा का लागला? – उद्धव ठाकरे
- Chandrashekhar Bawankule | “कलंकित करंटा उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Dhananjay Munde | छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंना जीवे-मारण्याची धमकी