Share

अजितदादांच्या वैमानिकाचा ‘धक्कादायक’ रेकॉर्ड! दोनदा ‘अल्कोहोल टेस्ट’मध्ये फेल; ३ वर्ष घरी बसवला होता?

अजित पवारांच्या विमानाचे वैमानिक सुमित कपूर हे २०१० आणि २०१७ मध्ये अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळले होते, ज्यामुळे त्यांना ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.

Published On: 

Captain Sumit Kumar ajit pawar

पुणे – अजितदादांच्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता एक अशी माहिती समोर आली आहे जी वाचून तुमचा संताप अनावर होईल. ज्या वैमानिकाच्या हातात अजितदादा आणि इतर प्रवाशांचे प्राण होते, त्या Captain Sumit Kapoor यांचा भूतकाळ किती डागाळलेला होता, हे आता समोर आलं आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार,  कॅप्टन सुमित कपूर यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर सुरक्षेचे तीनतेरा वाजले होते की काय, असा प्रश्न पडतोय.

दोनदा ‘ती’ चूक आणि…

वैमानिकांसाठी उड्डाणापूर्वी ‘ब्रेथ ॲनालायझर’ (Breath Analyzer) टेस्ट अनिवार्य असते. ही टेस्ट म्हणजे वैमानिकाने मद्यपान केले आहे की नाही, हे तपासण्याची पद्धत. धक्कादायक माहिती अशी की, कॅप्टन सुमित कपूर या चाचणीत एकदा नाही तर दोनदा दोषी आढळले होते. पहिली घटना २०१० मधली आहे, जेव्हा ते सहारा एअरलाईन्समध्ये होते. त्यावेळी त्यांची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. वाटलं असेल की यातून ते धडा घेतील. पण तसं झालं नाही. पुन्हा २०१७ मध्ये, जेव्हा ते इंडिगो एअरलाईन्ससाठी काम करत होते, तेव्हा पुन्हा एकदा ते या टेस्टमध्ये फेल झाले.

Captain Sumit Kapoor Suspended

३ वर्षांसाठी केलं होतं निलंबित

वारंवार अशी चूक घडल्याने त्यावेळी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली होती. २०१७ मधील घटनेनंतर त्यांना चक्क ३ वर्षांसाठी निलंबित (Suspended) करण्यात आलं होतं. म्हणजेच, तीन वर्ष त्यांना विमान चालवण्यापासून रोखण्यात आलं होतं. आता प्रश्न असा पडतो की, एवढा गंभीर रेकॉर्ड असताना त्यांना पुन्हा इतक्या महत्त्वाच्या व्हीआयपी फ्लाईटची जबाबदारी कशी दिली गेली?

सध्या या अपघाताचा तपास सुरू आहे, पण कॅप्टनच्या या जुन्या ‘कारनाम्यांमुळे’ आता या तपासाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. हा केवळ अपघात होता की मानवी चूक, हे लवकरच स्पष्ट होईल. पण या एका निष्काळजीपणामुळे महाराष्ट्राने आपला एक ढाण्या वाघ गमावला आहे, हे मात्र नक्की.

जागतिक विमान वाहतूक संस्था म्हणजेच ICAO (International Civil Aviation Organization) ने भारताला आधीच काही धोक्याचे इशारे दिले होते. विशेषतः धावपट्टीच्या (Runway) सुरक्षेबाबत हे इशारे होते. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, “ICAO ने भारतातील ‘टेबल टॉप’ किंवा धोकादायक रनवेजसाठी ‘Runway End Safety Areas’ (RESA) वाढवण्याची शिफारस केली होती.”. म्हणजेच, जर विमान धावपट्टीवरून घसरलं, तर त्याला थांबण्यासाठी पुढे सुरक्षित जागा असावी, असा हा नियम आहे.

रेड फ्लॅग्ज (Red Flags) कडे काणाडोळा?

“Were Regulatory Red-Flags Ignored?” म्हणजेच, आंतरराष्ट्रीय मानकांकडे आणि धोक्याच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं का?. बारामतीतील हा अपघात म्हणजे अशाच एखाद्या निष्काळजीपणाचा परिणाम तर नाही ना? जर धावपट्टीच्या पुढे सुरक्षित क्षेत्र (Safety Area) पुरेसं असतं, तर कदाचित हे विमान क्रॅश न होता थांबवता आलं असतं आणि अजितदादांचे प्राण वाचले असते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install