Share

Anil Deshmukh | सरकार आपल्याच एजन्सीकडून उदोउदो करून घेत आहे; अनिल देशमुख यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Anil Deshmukh | नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबत सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली होती. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर टीका केली आहे. हे सर्व प्रकार बंद करून जनसामान्यांच्या  प्रश्नकडं लक्ष द्या, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. Pay … Read more

Published On: 

Anil Deshmukh | नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदाबाबत सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली होती. या सर्व प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर टीका केली आहे. हे सर्व प्रकार बंद करून जनसामान्यांच्या  प्रश्नकडं लक्ष द्या, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Pay attention to people’s problems – Anil Deshmukh

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे, ते आता बंद झाले पाहिजे. हा प्रकार बंद करून जनसामान्यांच्या अडचणीकडं लक्ष द्यायला हवं. शिंदे गटानं त्यांच्या एजन्सीकडून सर्वे केला. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं एक सर्वे केला आणि त्यांनी त्यांची आकडेवारी समोर आणली.”

पुढे बोलताना ते (Anil Deshmukh) म्हणाले, “आपल्या एजन्सीला कामाला लावायचं आणि आपलाच उदोउदो करायचा. आपला उदोउदो करून जनतेची दिशाभूल करायची, हा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे.

दरम्यान, न्यूज एरीना इंडिया या संस्थेच्या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात भाजपाला सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री पदासाठी 35 टक्के लोकपसंती मिळत असल्याचं या सव्हेतून (Anil Deshmukh) सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install