मुंबई, 3 ऑक्टोबर: मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने (Monsoon Withdrawal) माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबतची अधिकृत घोषणा केली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच मोसमी वारे माघारी परतत असल्याची हवामान विभागाची घोषणा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
Monsoon Withdrawal Maharashtra
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत देशभरातील १३ राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, संपूर्ण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांचा समावेश आहे. दुसरीकडे, दक्षिणेतील काही भागांत जोरदार तर केरळमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८७.४ टक्के पाऊस झाला आहे. सामान्यतः या काळात ८६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा ७५९.४ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली. १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान देशात पावसाची १२.६ टक्के तूट नोंदवली गेली असून, २००१ नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- चंद्रशेखर बावनकुळेंनी बांधावर बसून शेतकऱ्यांसोबत केले जेवण, जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
- ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची पोलिसांकडून चौकशी; आमदार संजय गायकवाडांची मालमत्ता जप्तीची मागणी
- सणासुदीत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती
Quick Answers
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत देशभरातील १३ राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल.
यंदाच्या मान्सून हंगामात देशात सामान्य ८६८.६ मिलिमीटरच्या तुलनेत केवळ ७५९.४ मिलिमीटर (दीर्घकालीन सरासरीच्या ८७.४ टक्के) पाऊस पडला. यात १२.६ टक्के तूट नोंदवली गेली असून, २००१ नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









