National Film Awards: भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च आणि मानाचा असा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, गेल्या सात दशकांपासून या पुरस्कार सोहळ्याची आणि नवी दिल्लीतील विज्ञान भवनाची एक घट्ट नाळ जोडलेली होती. पण यंदा या ७२ वर्षांच्या परंपरेला फाटा देण्यात आला आहे. कारण, इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा दिल्लीबाहेर पार पडणार असून तो गुजरातला हलवण्यात आला आहे.
येत्या २२ सप्टेंबर रोजी या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे भव्य वितरण होणार आहे. विशेष म्हणजे हा बहुचर्चित सोहळा गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’समोर रंगणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केलं जाईल.
National Film Awards: ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा नवा अध्याय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा अत्यंत मोठा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामागे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा आणि देशाच्या प्रादेशिक विविधतेचा सन्मान करण्याचा मुख्य हेतू आहे. त्यामुळेच आता १९५४ सालापासून सुरू असलेली दिल्लीतील परंपरा मोडून हा सोहळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ५९७ फूट उंच स्मारकाच्या (Statue of Unity) साक्षीने पार पडणार आहे.
यंदाच्या विजेत्यांवर नजर टाकली तर, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने मोठी बाजी मारली आहे. हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून, यामी गौतमला याच चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दुसरीकडे, मामुटी (‘ब्रह्मयुगम’) आणि युवा अभिनेता कार्तिक आर्यन (‘चंदू चॅम्पियन’) यांना विभागून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बहुमान मिळाला आहे.
याशिवाय, अभिनेता रणदीप हुड्डाला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर, ‘भंगार’ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म आणि संजीव श्रीवास्तव यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून गौरवण्यात येणार आहे. तसेच ‘राम-नामी’ला ज्युरींचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री पुरस्कार मिळाला आहे.
यंदा प्रादेशिक सिनेमांचा मोठा डंका पाहायला मिळत आहे. मराठी, तमिळ, मल्याळम यांसोबतच पहिल्यांदाच ‘संथाली’ भाषेतील चित्रपटाला नॉन-फीचर फिल्म श्रेणीत सन्मानित केलं जाणार आहे. सोबतच, ‘पुष्पा २’, ‘कल्कि २८९८ एडी’, ‘स्त्री २’ आणि ‘भूल भुलैया ३’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये गौरवलं जाणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंच्या भेटीला आता सरकारचं शिष्टमंडळ जाणार नाही; विखे पाटलांचा मराठा आरक्षणावर मोठा दावा
- मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस; फडणवीस आणि विखे पाटलांची सर्वात मोठी घोषणा
- ‘दहीहंडीत पोरी नाचवणारे देशद्रोही!’; गौतमी-राधा पाटील यांच्या नृत्यावरून संभाजी भिडे संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











