Share

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने BCCI ला फटकारले; क्रिकेटच्या VIP ट्रिटमेंटला एशियन गेम्समध्ये ब्रेक

एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेटपटूंसाठी विशेष सुविधा देण्यास भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नकार दिला असून, बीसीसीआयला स्वतःची व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

Published On: 

IOA rejects BCCI request for special accommodation for Indian cricketers at Asian Games

Asian Games: भारतीय क्रिकेट संघ आणि बीसीसीआयला कायम मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रिटमेंटला आगामी एशियन गेम्समध्ये थोडा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेटपटूंसाठी विशेष हॉटेल आणि राहण्याची सोय करण्याची बीसीसीआयची मागणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) थेट फेटाळून लावली आहे. आयोजकांनी दिलेली व्यवस्था मान्य करा किंवा मग स्वतःची सोय स्वतः करा, अशी स्पष्ट भूमिका आयओएने घेतल्याने आता नवा पेच निर्माण झाला आहे.

आयओएचे सीईओ रघुराम अय्यर यांनी यावर बीसीसीआयला उत्तर दिलं आहे. जर बीसीसीआय आयोजकांची व्यवस्था नाकारून स्वतःची वेगळी व्यवस्था करणार असेल, तर खेळाडूंचा आहार आणि त्यांना वेळेत मैदानावर पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारीही बीसीसीआयलाच घ्यावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

IOA rejects BCCI request for special accommodation for Indian cricketers at Asian Games 

एशियन गेम्समध्ये क्रिकेटपटूंच्या हॉटेल आणि सुविधेवरून नवा वाद; ‘सुविधा घ्या किंवा स्वतःची व्यवस्था करा’

सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी पुरुष आणि महिला क्रिकेट संघांसाठी आधीच हॉटेल बुकिंग पूर्ण केलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला थ्री-स्टार ‘एपीए हॉटेल नागोया एकीमाए’मध्ये खोल्या देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, महिला संघाची सोय फोर-स्टार ‘मेईतेत्सु ग्रँड हॉटेल’मध्ये करण्यात आली आहे. पण बीसीसीआयच्या नाराजीचं मुख्य कारण म्हणजे या हॉटेल्सचा दर्जा आणि खोलीतील व्यवस्था.

हे दोन्ही हॉटेल्स नेहमीच्या पंचतारांकित (Five-star) दर्जापेक्षा कमी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खेळाडूंना एकाच खोलीत दोघांनी राहावं लागणार आहे. नेहमी सिंगल रूममध्ये राहण्याची सवय असलेल्या क्रिकेटपटूंसाठी हे थोडं गैरसोयीचं ठरू शकतं, त्यामुळेच बीसीसीआयच्या गोटात अस्वस्थता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआय लवकरच आपली एक टीम पाहणीसाठी जपानला पाठवणार आहे.

बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी या संदर्भात आयओएशी चर्चा केली आहे. त्यावर रघुराम अय्यर यांनी सांगितलं की, बीसीसीआयची टीम तिथल्या सुविधांची पाहणी करेल, याला आमची कोणतीही हरकत नाही. पाहणीनंतर आयोजकांचे हॉटेल वापरायचे की स्वतःची व्यवस्था करायची, याचा अंतिम निर्णय बीसीसीआय घेऊ शकते. आयओएला स्पर्धेतील सर्व ३६ खेळांमधील खेळाडूंना समान वागणूक द्यायची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर, महिला संघासमोर आशिया चषकाच्या फायनलनंतर लगेच जपानला रवाना होण्याचं आव्हान असतानाच, आता राहण्याच्या सुविधेवरूनही बीसीसीआयला मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही