मराठी क्रिकेटपटू (Cricket) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटला निरोप देताना त्याने एक भावूक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याचे डोळे पाणावलेले दिसत होते.
तरीही, या खेळाबद्दलची अजिंक्य रहाणेची आवड तशीच कायम आहे. अलीकडेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान त्याला समालोचक म्हणून काम करताना पाहिले गेले, ज्यावरून असे सूचित होते की तो आपल्या कारकिर्दीतील ‘दुसरी इनिंग’ सुरू करत आहे.
Ajinkya Rahane meets CM Devendra Fadnavis
या पार्श्वभूमीवर, अजिंक्य रहाणेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. त्याने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली.
या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे रहाणेने मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली?, याबद्दल तर्क-वितर्क लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
राज्य सरकारने यापूर्वी अजिंक्य रहाणेला क्रिकेट अकादमीसाठी मुंबईतील वांद्रे येथे जमिनीचा एक भूखंड मंजूर केला होता. हा भूखंड मूळतः सुनील गावस्कर यांना देण्यात आला होता, परंतु तिथे कोणताही विकास न झाल्यामुळे तो परत घेण्यात आला होता.
हा भूखंड २,००० चौरस मीटरचा आहे. जागतिक दर्जाची अकादमी उभारण्याच्या उद्देशाने, अत्याधुनिक क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी रहाणेने या जमिनीची मागणी केली होती.
दरम्यान, ‘सेना’ कंन्ट्रीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये ५,००० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२ शतकांचा समावेश आहे. त्याने यातील बहुतांश शतके परदेशात झळकावली आहेत आणि ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’मधील त्याच्या योगदानासाठी तो विशेषतः ओळखला जातो.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका’; PM मोदींचं आवाहन
- सुनेत्रा पवारांचा पदाधिकाऱ्यांना इशारा; ‘सक्रिय नसाल तर बदला’
- नवरात्राआधी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप? ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या रडारवर
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






