Rohit Pawar on MPSC या सरकारमध्ये असे काही लोक आहेत जे ‘ऑनलाइन’ परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत असल्यामुळे ‘ऑफलाइन’ परीक्षांची बाजू मांडतात. मात्र, ‘ऑफलाइन’ परीक्षांमध्येही गैरप्रकार घडतात. आम्हाला ‘ऑनलाइन’ परीक्षा नकोत, तर त्याऐवजी MPSC द्वारे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात ‘ऑफलाइन’ परीक्षा घेतल्या जाव्यात, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज केली.
MPSC कडून ‘ड्रग्ज इन्स्पेक्टर’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. आज रोहित पवार यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांनी MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Rohit Pawar on MPSC paper leak
यावेळी रोहित पवार म्हणाले की, MPSC चे अध्यक्ष हे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याचे मित्र आहेत. आरटीओ कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातलेत, याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मग असा गोंधळ घालणारा अधिकारी जर तुम्ही MPSCचा अध्यक्ष बनवत असाल तर हे आम्हाला मान्य नाही.”
पुढे ते म्हणाले की, “नैतिक जबाबदारी घेऊन या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा दिला पाहिजे. या महिन्याअखेरपर्यंत एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही, तर 1 तारखेला दुपारी 12 वाजता आम्ही MPSC च्या कार्यालयावर जाणार. तिथे जाणाऱ्या अध्यक्षाला आणि सचिवाला भेटून जाब विचारणार,असा अल्टीमेटम त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी सांगितले की, 2023 पासून बघितलं तर मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक, वन संरक्षण, तलाठी भरती, महाजनको, कोतवाल भरती, सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याचे पेपर फुटले. तलाठी भरतीमध्ये 40 लाखाला एक एक पेपर गेला. सुमारे 4 हजार कोटींचा भ्रष्टाचार याच्यात झाला होता.
“जलसंपदा, राज्य उत्पादन शुल्क, एसएससी केमिस्ट्री, एफडीए, एसआरपीएफ, नीट (NEET) आणि सीईटी परीक्षा या सगळ्यामध्ये गोंधळ व घोटाळे झाले आहेत. माझ्या माहितीनुसार MPSC चे ३ अधिकारी या पेपर फुटीमध्ये सहभागी आहेत.” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
“एक क्लासवाले माझ्यावर बोलत होते आणि दुसऱ्या दिवशी गुजरातला जाऊन बसले. 40-40 लाख रुपयांना एक-एक पेपर गेला आहे. या प्रकरणाचा पोलिसांचा अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे आणि या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
पवार म्हणाले की, “जर MPSC किंवा इतर कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आले पाहिजे. मग ते एसआरपीएफचे असोत किंवा आंदोलन करणारे आदिवासी समाजाचे विद्यार्थी असोत. सर्वांना पाठिंबा दिला पाहिजे. मराठी माणूस म्हणून आणि भारतीय म्हणून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र येणे ही खूप मोठी ताकद आहे.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मालवणच्या पुतळ्याचा जाब विचारला का?’; राहुल गांधींवरून टीका करणाऱ्या शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे ४ सडेतोड सवाल
- ‘सहा महिन्यांनी लज्जा उत्पन्न झाली का?’ संगीता तिवारींचा रूपाली चाकणकरांवर घणाघात
- सायरनची दहशत आणि विना नंबर प्लेट गाड्यांचा सुळसुळाट: छत्रपती संभाजीनगरात नियम फक्त सामान्यांनाच का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











