Share

‘देशात साखर घोटाळा’; वाढत्या दरांवर राजू शेट्टींचा गंभीर आरोप

वाढत्या साखरेच्या दरांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारवर गंभीर आरोप करत गोडाऊन तपासणीची मागणी केली.

Published On: 

Raju Shetti on sugar price hike

देशभरात साखरेचे भाव वाढल्यामुळे शेतकरी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचे कारण म्हणजे, भाववाढीमुळे सामान्य ग्राहक संतप्त असतानाच, शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहे. कारण त्यांना या वाढीचा कोणताही लाभ मिळत नाही.

केंद्र सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले की, “साखरेचे भाव वाढल्याचा फायदा जर शेतकऱ्यांना झाला असता, तर आम्हाला आनंद झाला असता.” त्यांनी निदर्शनास आणून दिले की, सरकारने १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आयात केलेली साखर ऑक्टोबरमध्ये येणार असल्याने साखरेचे भाव कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, साखरेच्या वाढत्या भावांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.

Raju Shetti on sugar price hike

साखरेचा मासिक कोटा २.२ दशलक्ष टन इतका आहे, तरीही सरकारने बाजारात आणलेल्या ४.५ ते ४.८ दशलक्ष टन साखरेचा कोणताही योग्य हिशोब उपलब्ध नाही. असे दिसून येते की, साखरेची साठेबाजी करणे आणि नंतर ती चढ्या दराने विकणे, असे धोरण दिसत आहे.

राज्यातील काही साखर कारखान्यांनी टेंडर्स काढल्या पण प्रत्यक्षात साखर विकली नाही. यावरून किमती वाढवण्याचा हा एक पूर्वनियोजित कट आहे. सरकारी देखरेखीच्या अभावामुळे देशात ‘साखर घोटाळा’ झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

“जर सरकारने योग्य नियंत्रण ठेवले असते, तर बाजारातील अशा प्रकारची हेराफेरी झाली नसती. सरकारी आकडेवारीनुसार साखरेची कोणतीही प्रत्यक्ष टंचाई नाही आणि पुढील वर्षी उत्पादन ३०० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.” असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

“यासंदर्भात मी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. लोकांमध्ये निर्माण झालेला असंतोष केवळ साखर उपलब्ध नसण्यामुळे नाही, तर वाढत्या किमतींमुळेही आहे. त्यामुळे, साखरेचे गोडाऊन तपासले पाहिजे, कागदावर अन् गोडाऊनची तपासणी झाली पाहिजे.” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

साखरेचे दर वाढवून काही लोक पैसा कमवत आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, खरोखरच साखरेची टंचाई असती, तर महाराष्ट्रच काय देशात कुठेही साखर मिळत नाही, म्हणून लोक अस्वस्थ झालेले पाहायला मिळत नाहीत. साखर फक्त महाग झाली आहे. टंचाईच नसेल तर अचानक दरवाढ व्हायचे कारण काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

“या दरवाढीचा शोध घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांचे आणि साखर कारखानदारांचे गोडाऊन तपासावेत, कागदावर किती स्टॉक आहे आणि गोडाऊनमध्ये किती आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि रेकॉर्डवर नसलेली साखर जप्त केली,” पाहिजे अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे

“केंद्र सरकारने निर्यातवर बंदी घातली, पण चोरट्या मार्गाने साखर बांगलादेश, पाकिस्तान मध्ये गेली का? जर साखर बाहेर गेली तर गृह खात काय करीत होते? ग्राहकांच्या खिशावर दरोडा पडतोय, देशाबाहेर साखर गेली याची जबाबदारी अमित शहा आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर आहे, असेही राजू शेट्टींनी म्हटले.

“काहींचे ऑफिस दुबईला आहे, काही मूठभर लोक आहेत त्यांनी हे केले आहे, असा आरोपही राजू शेट्टींनी केला. इथेनॉल आणि साखरेचा काहीही संबंध नाही, मोदी है तो सब मुमकीन है. केंद्र सरकारच्या सांगण्यावर इथेनॉलमध्ये 45 हजार कोटींची गुंतवणूक केल, याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

“सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांची FRP द्यावी. सरकार कमी पडत असून वेळप्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ, अशा शब्दात राजू शेट्टींनी सरकारला इशाराही दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही