Share

जनहित याचिकेला १२ वर्ष विलंब; विशाल पाखरे यांचे थेट उच्च न्यायालयासमोरच आमरण उपोषण

१२ वर्षांपासून प्रलंबित जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी भीम सेनेचे अध्यक्ष विशाल पाखरे १५ ऑगस्टला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

Published On: 

जनहित याचिकेला १२ वर्ष विलंब; विशाल पाखरे यांचे थेट उच्च न्यायालयासमोरच आमरण उपोषण

छत्रपती संभाजीनगर– एखादी जनहित याचिका चक्क १२ वर्षे प्रलंबित राहू शकते का? न्याय मिळायला इतका उशीर होत असेल तर सर्वसामान्यांनी जायचं कुठे? याच प्रश्नावरून आता थेट उच्च न्यायालयासमोरच आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे.

राष्ट्रवादी भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल कडूबा पाखरे (Vishal Pakhare) यांनी हा मोठा इशारा दिला आहे. जनहित याचिका क्रमांक १४७/२०१४ च्या प्रलंबित सुनावणीसाठी ते १५ ऑगस्टला उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष जगदीश कोंडामंगल हे देखील असतील.

Vishal Pakhare PIL Pending For 12 Years Vs MGM

पाखरे यांनी २०१४ मध्ये ही जनहित याचिका दाखल केली होती. पण गेली १२ वर्षे हे प्रकरण केवळ ‘फॉर ॲडमिशन’ याच टप्प्यावर अडकले आहे. अनेक न्यायमूर्तींनी हे प्रकरण ‘नॉट बिफोर मी’ केले. त्यामुळे सुनावणीला प्रचंड विलंब झाला. याचिकेचा मूळ उद्देशच नष्ट होण्याची भीती पाखरे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत पाखरे यांनी उच्च न्यायालयाचे निबंधक आणि पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र दिले आहे. या पत्रातून त्यांनी एक गौप्यस्फोटही केला आहे. प्रतिवादी असलेल्या एमजीएम (MGM) संचालक मंडळाकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. यापूर्वीही आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली होती. न्यायाला होणाऱ्या या विलंबामुळे पाखरे अत्यंत व्यथित झाले आहेत.

हे प्रकरण लवकरात लवकर योग्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी घ्यावे, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. स्वातंत्र्यदिनीच म्हणजेच १५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठासमोर उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही